मुंबईः राज्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय ही वस्तुस्थिती असली तरी करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासादायक आहे. आज विक्रमी संख्येनं रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासांत विविध रुग्णालयांतून १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) ६९. ६४ टक्के इतका झाला आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

राज्यात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. आत तब्बल १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रग्ण बरे होण्याच्या दरात एक टक्क्यानं वाढ झाली असून सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ६९.६४ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४७ हजार ५१३ अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

वाचाः

करोना विषाणूचा राज्यात उपद्रव वाढला असून, दररोजच बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज तब्बल १२ हजार ७१२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं एकूण राज्यातील करोना रुग्णांची संख्या ५ लाख ४८ हजार ३१३ इतकी झाली आहे. तर राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २९ लाख ०८ हजार ८८७ चाचण्यांपैकी ५ लाख ४८ हजार ३१३ (१८.८४ टक्के) चाचण्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

वाचाः

आज राज्यात ३४४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के इतका आहे. राज्यात आज झालेल्या मृत्यूंमुळं राज्यातील एकूण मृतांचा आकडा १८ हजार ६५० इतका झाला आहे. आज नोंद झालेल्या एकूण ३४४ मृत्यूंपैकी २३८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत तर, ६६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४० मृत्यू नाशिक- १२, ठाणे जिल्हा- ११, पालघर-३, कोल्हापूर- ३, परभणी-२, धुळे- २, उस्मानाबाद-२, औरंगाबाद-१, लातूर-१, नंदूरबार-१, सांगली-१ आणि सोलापूर- १ असे आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here