सुर्यकुमार यादव आरसीबी च्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने अवघ्या ३७ बॉल मध्ये ८३ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने सात चौकार आणि सहा षटकार लगावले.मुंबई इंडियनने या विजयानंतर गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे.गुजरात टायटन्स प्रथम, चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे.
आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९९ धावा केल्या होत्या. तर मुंबई २०० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरली होती. सुरुवातीला ईशान किशनने २१ बॉल मध्ये ४२ धावा करत मुंबईच्या विजयाचा पाया रचला.रोहित शर्मा केवळ ७ धावा करून बाद झाला.
यानंतर मैदानात उतरलेल्या सुर्यकुमार यादव आणि नेहाल वढेरा यांनी मुंबईच्या विजयाचा कळस चढवला. तिसऱ्या विकेट साठी दोघांनी ६२ बॉल मध्ये १४० धावांची भागिदारी केली. तर नेहाल वढेरा ३४ बॉल मध्ये ५२ धावा करुन नाबाद राहिला. आरसीबीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना १९९ धावा केल्या. सुरुवातीला १६ धावांवर दोन गडी बाद झाले होते. त्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि मॅक्सवेलनं १२० धावांची भागिदारी केली. यानंतर मॅक्सवेलनं ३३ बॉलमध्ये ६८ धावा केल्या. तर फाफ डु प्लेसिसनं ४१ धावांमध्ये ६५ धावा केल्या. तर, दिनेश कार्तिकनं ३० धावा करत आरसीबीला १९९ धावांपर्यंत पोहोचवलं.
सौरव गांगुली कडून सूर्यकुमार यादवचं कौतुक
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली देखील सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीनं प्रभावित झाला. सूर्यकुमार यादव हा टी-२० क्रिकेटमधील बेस्ट खेळाडू आहे, असं सौरव गांगुली म्हणाला. तो जणू काही संगणकावर फलंदाजी करताोय, असं वाटत असल्याचं सौरव गांगुली म्हणाला. दादानं सूर्यकुमार यादवचं कौतुक केल्यानंतर मुंबई इंडियन्सनं देखील रिप्लाय दिला. दादाकडून सूर्या दादाचं कौतुक, असा रिप्लाय मुंबई इंडियन्सनं सौरव गांगुलीच्या ट्विटला दिला.