Ulhasnagar Crime News: भावा-बहिणीचं नातं पवित्र मानलं जातं. रक्षाबंधनाच्या दिवशी ज्यावेळी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते, त्यावेळी भाऊ बहिणीची आयुष्यभर रक्षा करण्याचं वचन देतो. पण याच भावानं आपल्या 12 वर्षांच्या चिमुकल्या बहिणीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar News) घडली आहे. बहिणीला मासिक पाळी (Menstrual Cycle) आल्यानं भावानं तिला मारहाण करुन आपल्या 12 वर्षांच्या बहिणीचा जीव घेतला. महाराष्ट्रातील (Maharashtra Crime News) उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. 

उल्हासनगरमध्ये एका 12 वर्षांच्या मुलीची तिच्या सख्ख्या भावानं निर्घृण हत्या केली. ही मुलगी तिचा भाऊ आणि वहिनीसोबत राहात होती. या मुलीला नुकतीच पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. पण तिच्या वहिनीनं त्यावरून आपल्या नवऱ्याला चुकीची माहिती दिली. त्यानंतर त्यानं कुणाशी तरी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून आपल्या बहिणीला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. त्यानं बहिणीला सांडशीनं चटकेही दिले. हा छळ सहन न होऊन बारा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांनी निर्दयी भावाला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धक्कादायक घडनेत मृत्यू झालेली मुलगी आपला भाऊ आणि वहिनीसोबत उल्हासनगर येथे राहत होती. तर मुलीचे आई-वडिल गावी राहत होते. या मुलीला काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती. मात्र ते पाहून तिच्या वहिनीने नवऱ्याला चुकीची माहिती दिली. तुमच्या बहिणीचे कुठेतरी प्रेमसंबंध असून त्यातून शारीरिक संबंध ठेवल्यानं हा रक्तस्त्राव होत असल्याचं वहिनीनं सांगितलं. त्यामुळं या मुलीचा मोठा भाऊ संतापला आणि तब्बल तीन दिवस त्यानं बहिणीला जबर मारहाण केली. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत सांडशीनं चटके दिले. यातच 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. यानंतर भावानं स्वतःच तिला मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. तर तिचा पोस्टमॉर्टम केला असता त्यात तिच्या तोंडावर, मानेवर, पाठीवर चटके दिल्याच्या आणि मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळं डॉक्टरांनी याबाबत मध्यवर्ती पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी या निर्दयी भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. 

मुलीच्या वहिनीवर भडकावल्याचा आरोप 

मिळालेल्या माहितीनुसार, घडलेल्या घटनेमध्ये मृत मुलीच्या वहिनीचंही नाव समोर येत आहे. मुलीला मासिक पाळीमुळे होणारा रक्तस्त्रावाबाबत वहिनीनं चुकीची माहिती दिली. तिनं भावान तुमच्या बहिणीचे कुठेतरी प्रेमसंबंध असून त्यातून शारीरिक संबंध ठेवल्यानं हा रक्तस्त्राव होत असल्याचं सांगितलं. त्यामुळे भावानं रागात हे कृत्य केलं. दरम्यान, मृत मुलगी आपली वहिनी आणि भावासोबत उल्हासनगरमध्ये राहत होती. तिचा भाऊ सिक्योरिटी गार्डचं काम करत होता. तर मुलीचे आई-वडिल गावी राहत होते. 

news reels reels

पोस्टमॉर्टमध्ये मारहाणीमुळे हत्या झाल्याचा खुलासा 

रागात भावानं त्याच्या बहिणीला तब्बल तीन दिवस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तिला त्यानं उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली असता, मुलीच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि पाठीवर मारहाणीच्या खुना आढळल्या. पोलिसांनी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here