आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $७६.९१ आहे. त्याच वेळी, WTI कच्चे तेल प्रति बॅरल $७३.१९ आहे.
तेलाच्या किमती दररोज अपडेट होतात
भारतात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम सारख्या तेल विपणन कंपन्या (OMCs) दररोज इंधनाच्या किमती सुधारतात. कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय दर लक्षात घेऊन वाहन इंधनाचे दर सुधारित केले जातात. दर नवीन असोत किंवा बदललेले नसले तरी, दररोज सकाळी ६ वाजता जाहीर केले जातात. तसेच, पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार वेगवेगळे आहेत. हे मूल्यवर्धित कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादींच्या आधारावर इंधनाचे दर अपडेट केले जातात.
पेट्रोल आणि डिझेलचा आजचा भाव
बुधवारी इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही म्हणजे आजही वाहन इंधनाची किंमत जुन्याच पातळीवर स्थिर आहे. देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास वर्षभरापासून स्थिर आहेत. गेल्या वर्षी २१ मे २०२२ रोजी तेलाच्या किमतीतील शेवटची सुधारणा करण्यात आली होती. दुसरीकडे, तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांनी RSP कोड ९२२४९९२२४९ वर पाठवा. अशा स्थितीत आजही मुंबईकरांना पेट्रोल-डिझेलसाठी मोठी किंमत मोजावी लागेल. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर १०६.३१ रुपये तर डिझेलसाठी चालकांना प्रति लिटर ९४.२७ रुपये खर्च करावा लागेल.
डिझेलसाठी बीड बस डेपोकडे पैसेच नाही; ८२ पैकी फक्त २० बसेस सुरु; प्रवाशांची तारांबळ अन् संताप