नागपूर: ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट वादात सापडला आहे. भाजपकडून या चित्रपटाचे जोरदार समर्थन केले जात आहे, तर विरोधक हा राजकीय फायद्यासाठी द्वेषपूर्ण चित्रपट असल्याची टीका करत आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यकर्त्यांसह जाऊन चित्रपट पाहिला. ‘द केरला स्टोरी’ पाहिल्यानंतर फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आपल्या देशातील धक्कादायक सत्य या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आले आहे. आपला देश उद्ध्वस्त करण्याचे काम काही लोक करत आहेत. महिला आणि मुलींची दिशाभूल करून त्यांना कटात ओढले जात आहे. या गोष्टी समोर याव्यात. हा चित्रपट देशातील अनेकांचे डोळे उघडत असल्याचे फडणवीस म्हणाले.

अनेकांचे डोळे उघडतील, द केरला स्टोरी पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

सडल्या डोक्यात सडलेल्या विचारांना टांगण्याची वेळ आली आहे: देवेंद्र फडणवीस

धर्मांतर आणि लव्ह जिहादवर आधारित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग भाजप कार्यकर्त्यांसाठी नागपुरात आयोजित करण्यात आले होते. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चित्रपट पाहिला. या चित्रपटातून कटू सत्य लोकांसमोर येत असल्याचा दावाही त्यांनी केला. त्याचबरोबर या चित्रपटाच्या निर्मात्याला फासावर लटकवण्याची चर्चा करणाऱ्यांच्या सडलेल्या मनातील सडलेली विचारसरणी असल्याचे फडणवीस म्हणाले.असे म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचावर हल्ला केला.

‘केरला स्टोरी’ स्पॉन्सर करणाऱ्या नेत्यांवर केदार शिंदे भडकले, ट्विट करुन खरपूस समचार

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात ३२ हजार महिलांची कथा मांडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना दावा केला की, चित्रपटाचे निर्माते स्वत: न्यायालयाला सांगतात की ही कथा केवळ तीन महिलांची आहे. या चित्रपटामुळे आपल्या देशाची जगभरात बदनामी झाली असून, देशात धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.देशात अराजकता माजवणाऱ्या आणि देशाची बदनामी करणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या निर्मात्याला फासावर लटकवले पाहिजे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here