सोन्या-चांदीचा आजचा भाव
मल्टी कमोडिटी एक्स्चेंज म्हणजे MCX वर आज सोन्याचा भाव १४० रुपयांनी घसरला असून ६१,२८० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे एमसीएक्सवर चांदी १०० रुपये स्वस्त होऊन ७७,३५० रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील विक्री देशांतर्गत बाजारात नरमाईचे कारण बनली. याशिवाय गुडरिटर्न्स वेबसाइटवर जारी केलेल्या दरांनुसार मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,७०० रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीचा भाव प्रति किलो ७८,१०० रुपये आहे.
कॉमेक्स वर सोने आणि चांदी
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आज कमजोरी दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली असून अमेरिकन महागाईच्या आकडेवारीपूर्वी सराफा बाजारात उलथापालथ होताना दिसत आहे. कोमॅक्सवर किंचित घसरणीसह सोने प्रति औंस $२,०३८ वर व्यवहार करत असताना चांदीचा भाव २६ डॉलर प्रति औंसवर आहे.
उल्लेखनीय आहे की आज संध्याकाळी अमेरिकेतील महागाईची आकडेवारी जाहीर होईल. आणि किरकोळ महागाई दर ५% वरच राहू शकतो, असा बाजाराचा अंदाज आहे. मात्र, मूळ महागाई दरात किंचित नरमाई दिसून येत आहे. आजच्या सत्रात अमेरिकेतील महागाईचे आकडे जाहीर होतील, जे यूएस फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणावर परिणाम पाडू शकतात.
या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते
सोन्या-चांदीची पुढील वाटचाल
आगामी काळात लग्नसराईचा हंगाम आणि सणांमुळे एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे पुन्हा एकदा दोन्ही मौल्यवान धातू विक्रमी पातळीवर पोहोचतील.