मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध २०० धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवला. आयपीएलच्या १६व्या हंगामात, काल रात्री झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने धडाकेबाज अर्धशतक झळकावले. त्याला दुसऱ्या टोकाकडून युवा फलंदाज नेहल वढेराने देखील चांगली साथ दिली. सूर्याने ३५ चेंडूत ८३ धावा केल्या, तर वढेराने ३४ चेंडूत ५२ धावांचे नाबाद अर्धशतक झळकावले. यादरम्यान वढेराच्या बॅटमधून निघालेल्या षटकारांनी वानखेडे स्टेडियममध्ये खळबळ उडवून दिली. एकीकडे सूर्या बरसत होता तर नेहल मैदानात पाय रोवून उभा होता. नेहलच्या कालच्या खेळीमुळे मुंबईने विजयाची पताका फडकवली, यावरुन आता भारताला नवा युवराज मिळणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. डावखुऱ्या नेहल वढेराने उत्तुंग फटका मारला आणि मैदानाबाहेर उभ्या असलेल्या कारवर हा चेंडू जाऊन आदळला. चेंडू कारच्या दरवाजावर जाऊन बरोबर हँडलच्यावर लागला. यामुळे गाडीला डेंट आला. असं या स्पर्धेत दुसऱ्यांदा झालं आहे. यापूर्वी ऋतुराज गायकवाडने गाडीचं नुकसान केलं होतं.मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला ६ विकेट्स आणि २१ चेंडू राखून पराभूत केलं. मोठ्या विजयामुळे मुंबईला जबरदस्त फायदा झाला आहे. मुंबईने गुणतालिकेत १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे मुंबईचं प्लेऑफचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. कोण आहे नेहल वढेरानेहल वढेरा याचा जन्म ४ सप्टेंबर २००० रोजी लुधियाना, पंजाब येथे झाला. त्याने याच वर्षी रणजी कारकिर्दीला सुरुवात केली. यादरम्यान त्याची कामगिरीही चांगली झाली. त्याने गुजरातविरुद्ध १२३ आणि मध्य प्रदेशविरुद्ध २१४ धावांची द्विशतकी खेळी खेळून लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या देशांतर्गत कामगिरीने आयपीएल मधील मुंबई इंडियन्स संघही प्रभावित झाला.देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेहल वढेरा याला ‘युवा युवराज’ या नावाने ओळखले जाते. त्याला हे टोपणनाव त्याचे प्रशिक्षक हरजिंदर सिंग यांच्याकडून मिळाले. हरजिंदरला नेहलमध्ये युवराज सिंगसारखी क्षमता दिसते.नेहल वढेराने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण पाच प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने सात षटकांत ५३.७१ च्या सरासरीने ३७६ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने आठ टी-२० सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. दरम्यान, त्याने पाच डावांत २६.२० च्या सरासरीने १३१ धावा केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here