पतीचे निधन झालेल्या पुजाचे सध्याचे वय २४ वर्ष आणि मुलगा जयराज याचे अवघे साडे पाच वर्ष आहे.याचे दु:ख गावातील सर्वांनाही होते.नितीन तर गेला आता पुजाचे काय होईल? जयराज चे कसे होईल? असे अनेक प्रश्न परिवारा सह गावकऱ्यांना पडले होते.सुनेचे वय फार कमी असल्याने तिचे होते पुढे कसे होईल, याची चिंता असल्यानं सासू सास-याला घास गोड लागू देत नव्हती.सर्वांना वाटायचे पुजाचे लग्न दिर सचिन सोबत करुन द्यावे.सचिनला देखील जमीन नाही,पक्के घर नाही त्याचे लग्न जमण्यासाठी देखील अनेक समस्या होत्याच.पण अशा फक्त चर्चाच गेल्या ५ वर्षांपासून चालू होत्या.या विषयाचा कायमचा तुकडा पडावा लागेल या साठी त्यांच्या परिवारातील समजूतदार,सुशिक्षित लोकांनी एकदा प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न काही कारणाने लांबणीवर पडला होता.
जालन्यात फुलवली सफरचंदाची बाग, अर्ध्या एकरात मिळणार २ लाखांचं उत्पन्न, बळीराजाला विश्वास
अखेर गेल्या ८ दिवसात या विषयाचा तुकडा पडलाच पाहिजे या उद्देशाने परिवारातील सदस्यांनी ठाम निश्चय केला आणि भावकीतील प्रत्येकाकडे जाऊन त्यांना सचिन आणि पुजाच्या लग्ना विषयी चर्चा केली. सुशिक्षित मुलांनी घेतलेल्या या निर्णयाला परिवारातील सर्व आजोबा,चुलते,सर्व चुलत्या,सर्व चुलत भाऊ यांनी क्षणाचा ही विलंब न करता या विचाराला होकार दिला आणि सगळ्या परिवारातील सदस्यांनी हातावर साखर देत या ठरावाला मान्यता दिली. दोन दिवसांपूर्वी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर जालना शहराजवळील माळाच्या गणपती मंदिरा दोघांचे लग्न पार पडले.परिवारातील सुशिक्षित नव्या दमाच्या युवकांनी पुढाकार घेतल्याने किती तरी प्रश्नांची उत्तर या कार्याने मिळाली.या लग्नासाठी परिवारातील उद्धवदादा मरकड, किशोर आबा मरकड, रणवीर भैया मरकड, डॉ.गांडगे सर यांनी प्रयत्न करत पुढाकार घेतला आणि पूजा यांना पतीचा तर छोट्या जयराजला वडिलांचे छत्र पुन्हा मिळाले.
परिवारातील सदस्य आणि गावकऱ्यांच्या एकीमुळे एक विस्कटलेल्या संसाराची घडी पुन्हा बसल्याने या निर्णयाचे पंचक्रोशीत स्वागत केले जात आहे.