नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी ८६ वर्षीय महिलेच्या हत्येचे गूढ उकललं आहे. हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी या वृद्ध महिलेच्या सुनेला अटक केली आहे. फ्राईंग पॅनने या निर्दयी सुनेने वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हशी सोम (८६) ही वृद्ध महिला नेब सराय भागात आपल्या मुलासोबत राहत होती. महिलेचा मुलगा सुरजित सोम याने पोलिसांना सांगितले की, तो २०१४ पासून या ठिकाणी राहत होता. त्याचा २१ वर्षांपूर्वी सर्मिष्ठा सोम (४८) हिच्याशी विवाह झाला होता. त्यांची पत्नी गृहिणी असून त्यांना एक १६ वर्षांची मुलगीही आहे.

Nehal Wadhera: नेहलचा षटकार का तोफेचा गोळा! टाटाच्या कारवर डेन्ट; आता मिळणार ५ लाख…
२०२२ पर्यंत त्याची आई कोलकाता येथे एकटीच राहत होती. हे कुटुंब मूळचं कोलकाता येथील आहे. त्यानंतर त्याने आईला तेथून दिल्लीला आणलं आणि आईला त्याच्या फ्लॅटसमोरील फ्लॅटमध्ये ठेवले, जेणेकरून तिची काळजी घेता येईल.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, पीसीआर कॉलनंतर जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ही वृद्ध महिला किचनजवळ पडलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा होत्या. त्यांच्या मुलाने सांगितले की त्याची आई आजारी होती, तिला चालणं देखील कठीण झालं होते आणि ती आधाराशिवाय चालू शकत नव्हती. त्याच्या पत्नीला त्याची आई आवडत नव्हती. तिला तिच्या सासूबाईंना वृद्धाश्रमात पाठवायचे होते. त्याची आई एकदा बाथरूममध्ये पडली, त्यामुळे बाथरूम आणि स्वयंपाकघर जवळ होते, त्याने तिच्यासाठी त्याच्या घरासमोर एक फ्लॅट भाड्याने घेतला.

कलेक्टरची हत्या केली, तुरुंगात राहून खासदार झाला, सुटकेसाठी कायदाच बदलला

वृद्धेच्या मुलाने सांगितले की, त्याने प्रत्येक क्षणी आईला पाहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. घटनेच्या दिवशी लाईट गेली होती. शवविच्छेदन अहवालात या वृद्ध महिलेच्या जखमा सामान्य पडल्यामुळे झाल्या नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तर, सर्मिष्ठाला सासू आवडत नसल्याची माहिती नात आणि मुलाने पोलिसांना दिली होती. घटनेच्या दिवशी सर्मिष्ठा घरात हजर होती आणि वृद्धेच्या घराची चावीही तिच्याकडे होती. सुरजीतने पोलिसांना सांगितले की, घटनेच्या दिवशी पोलिसांना फोन करण्यापूर्वी तिने सीसीटीव्ही फुटेज कार्ड काढले होते.

फुटेजमध्ये २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता पत्नी सर्मिष्ठा तिच्या सासूच्या फ्लॅटमध्ये गेल्याचं दिसून आलं. तिच्या हातात फ्राईंग पॅन होता. त्यानंतर सीसीटीव्हीमध्ये वृद्ध महिलेच्या रडण्याचा आवाजही ऐकू आला. घटना घडल्यानंतर तिने तो फ्राईंग पॅन साफ केला. वृद्ध महिलेच्या शरीरावर १४ जखमांच्या खुणा होत्या. फुटेज आणि मुलाच्या जबाबाच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुनेला अटक करण्यात आली आहे.

ना राहायला घर, ना खायला पैसे; डोळे बंद करुन एक निर्णय घेतला अन् झाली ४१ कोटींची मालकीण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here