आग्रा: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक अत्यंत भीषण आणि दॉहृदयद्रावक अपघात घडला आहे. पहिल्याच वाढदिवशी एका चिमुकल्याचा वेदनादायक मृत्यू झाला आहे. खेळता-खेळता हा चिमुकला अचानक उकळत्या भाजीच्या कढईत पडला. जेव्हा मुलाच्या किंचाळण्याचा आवाज आले तेव्हा सारे तिकडे धावले. त्याला बघून घरात एकच खळबळ माजली, तात्काळ त्याला भाजीतून बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झालेला होता. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला होता. या घटनेने त्या चिमुकल्याच्या आई-वडिलांना धक्का बसला आहे. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आग्रा येथील कागरोल शहरातील आहे. वर्षभरापूर्वी शहरातील रहिवासी विनोद यांच्या पत्नीने जुळ्या मुलांना (एक मुलगा आणि एक मुलगी) जन्म दिला होता. मुलाचे नाव वंश आणि मुलीचे नाव वंशिका ठेवण्यात आले.

ना राहायला घर, ना खायला पैसे; डोळे बंद करुन एक निर्णय घेतला अन् झाली ४१ कोटींची मालकीण

सोमवारी म्हणजेच ९ मे रोजी दोन्ही मुलांचा पहिला वाढदिवस होता. पहिला वाढदिवस असल्याने मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं ठरलं. घरात पूजा आयोजित करण्यात आली. नातेवाईकांना बोलावण्यात आले. पाहुण्यांसाठी मेजवानीचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान, आचारी एका मोठ्या कढईत भाजी बनवत होता. तेवढ्यात वंश तेथे पोहोचला आणि तो उकळत्या भाजीत पडला. कढईत पडल्याने वंश गंभीररित्या भाजला गेला.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

उपस्थितांनी तात्काळ त्याला कढईतून बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मुलाच्या मृत्यूनंतर घरात एकच शोककळा पसरली आहे. एकुलत्या एक मुलाच्या दु:खद मृत्यूनंतर आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here