मुंबई : राज्यात आधीच अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशात मोचा चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला. हे चक्रीवादळ आता पश्चिम बंगालमधून हळूहळू पुढे सरकत आहे. त्यामुळे कुठे पाऊस तर कुठे उष्णता असं चित्र राज्यात आहे. मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कडाक्याचं उन पडलं असून यामुळे नागरिक त्रस्त आहे. पण राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही पाऊस सुरू असल्याची माहिती आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, एकीकडे मुंबई आणि उपनगरांमध्ये उन्हाचा तडाखा पहायला मिळत आहे. तर राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि नजिकच्या जिल्ह्यांमध्ये मंगळवार संध्याकाळपासून पाऊस सुरू असल्याची माहिती आहे. इथे अद्यापही पाऊस सुरू असून पुढचे काही दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस राहिल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Pune News : पुण्यातल्या बळीराजाची पंचक्रोशीत चर्चा; अख्ख्या गावासाठी ठेवलं जेवणं; कारण वाचून कराल सलाम
राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शहरांमध्ये वीजपुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम झाला. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजेच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा वाहत असल्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, पुढचे काही दिवस मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. पण या दरम्यान जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहिल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

Weather Alert : मोचा चक्रीवादळामुळे राज्याला अतिवृष्टीचा इशारा, पुढचे ४ दिवस ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट

तापमान वाढणार

राज्यात चक्रवातविरोधी स्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली असून, तापमानाचा पारा चढण्याची शक्यता आहे. यंदा मे महिन्यात मुंबईकरांना खूप चढ्या तापमानाला सामोरे जावे लागणार नाही, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, सध्याच्या चक्रवातविरोधी स्थितीमुळे मुंबईतील तापमानही ३७ ते ३८ अंशांदरम्यान पोहोचू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळं शेतीचं नुकसान झालं असून या दरम्यान वीज कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे.

Pune News : मैत्रिणीला इंप्रेस करण्यासाठी पोलीस बनला, एका चुकीने पुरता फसला; घटना वाचून खूप हसाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here