कॅलिफोर्निया: एक व्यक्ती १८ महिन्यांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. आता त्याच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हे समोर आलं आहे. हे प्रकरण अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचे आहे. येथे टेक कंपनीचे ३९ वर्षीय सीईओ हे उबेर कॅबने प्रवासासाठी निघाले होते. दरम्यान, प्रवासादरम्यानच ते बेपत्ता झाले होते. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. आता २५ एप्रिलला त्याची हाडं सापडली आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्याला मृत घोषित केले आहे.मेट्रो यूकेच्या रिपोर्टनुसार मृताचे नाव ब्यू मान असे आहे. ते व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य सेवा सोबर ग्रिड या अॅपचे संस्थापक होते. त्यांच्या अवशेषांची ओळख लॉस एंजेलिस काउंटी कॉरोनर कार्यालयाने केली आहेत. शेवटच्या वेळी ब्यूने त्याचे होणारे पार्टनर जेसन अबातेशी संवाद सधला होता. जेसन आणि ब्यू हे लग्न करणार होते. जेसन हे मिशिगनमध्ये राहतात. हे जोडपे पुढच्या वर्षी लग्न करण्याचा विचार करत होते. बेपत्ता होण्याच्या आदल्या रात्री जेसन आणि ब्यू यांचं बोलणं झालं होतं. ना राहायला घर, ना खायला पैसे; डोळे बंद करुन एक निर्णय घेतला अन् झाली ४१ कोटींची मालकीण ३० नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाला
ते म्हणाले होते की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि त्यांना माझ्यासोबत एक मूल दत्तक घ्यायचं आहे. हा त्यांचा अखेरचा मेसेज होता. ब्यू यांना ३० नोव्हेंबर २०२१ ला दुपारी २ वाजता अखेरचं पाहिलं गेलं होतं. त्यांना एका दुकानाबाहेर बघितलं गेलं, असं पोलिसांनी सांगितल. या दुकानपासून १५ मैलांवर त्यांची हाडं सापडली आहेत. तर हे दुकान त्यांच्या ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर आहे. दुकानातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी उबेर कॅब केली होती. येथून त्यांनी आपत्कालीन क्रमांक ९११ वर संदेश दिला होता.
कलेक्टरची हत्या केली, तुरुंगात राहून खासदार झाला, सुटकेसाठी कायदाच बदलला
४ डिसेंबरला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली
ब्यू यांचे मेसेज येणे बंद झाल्यावर जेसन घाबरले. त्यांनी ४ डिसेंबर रोजी ब्यू बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र, आता थेट त्यांची हाडं सापडल्याने खळबळ माजली आहे. सध्या पोलिस त्यांच्या हत्येचा तपास करत आहेत. त्यांची हत्या कोणी केली हे अद्याप समजू शकलेलं नाही. दुकानातून ते त्या ठिकाणी कसे पोहोचले जिथे त्यांची हाडं सापडली आहेत, याचाही तपास पोलिस करत आहेत.