रायपूर: आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशीच आणकी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. छत्तीसगडमधील भिलाई येथे लग्न समारंभात डान्स करताना एका व्यक्तीची मृत्यू झाला आहे. मृतक आपल्या पुतणीच्या लग्नात डान्स करत होते असे सांगितले जात आहे. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि स्टेजवरच त्यांचा मृत्यू झाला.या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मृत दिलीप राउजकर राजहरा येथील विद्युत अभियांत्रिकी विभागात सहायक अभियंता होते. ५२ वर्षीय दिलीप स्टेजवर पंजाबी गाण्यांवर जबरदस्त डान्स करत असल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्यासोबत वधू-वरही नाचत आहेत. दिलीप मोठ्या उत्साहात स्टेजवर नाचत होते, तेवढ्यात हा सारा अनुचित प्रकार घडला आणि कोणाला काही कळायच्या आत त्यांनी जगाचा निरोप घेतला.
ना राहायला घर, ना खायला पैसे; डोळे बंद करुन एक निर्णय घेतला अन् झाली ४१ कोटींची मालकीण
पाहा या घटनेचा धडकी भरवणारा व्हिडिओ –

नाचता-नाचता मृत्यू

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप हे ४ मे रोजी भाचीच्या लग्नासाठी गावी आले होते. आनंदाच्या वातावरणात ते स्टेजवर मोठ्या उत्साहात नाचत होते. अचानक त्यांना वेदना जाणवू लागल्याने ते स्टेजवरच बसले आणि बघता बघता कोसळले. याने मांडवात एकच गोंधळ माजला. आजूबाजूला उपस्थित असलेल्या सर्व नातेवाईकांनी त्यांना उचलून रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कॅबमध्ये बसला अन् गायब झाला, अखेर १८ महिन्यांनी भयंकर स्थितीत सापडला
स्टेजवरच अचानक हृदयविकाराचा झटका

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दिलीपच्या कुटुंबात दोन मुली आणि पत्नी आहेत. या घटनेनंतर लग्न घरावर शोककळा पसरली आहे. नातेवाइकांच्या डोळ्यातील पाणी थांबत नाही आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here