पंढरपूर: आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून तालुक्यातील येथे जवानाच्या पित्याला झाडाला बांधून केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी पोलिसांनी व्हायरल झालेल्या क्लिपमधील १२ जणांवर गुन्हा दाखल केला असून १० आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या आरोपींना मंगळवेढा न्यायालयात हजर केले असता सर्वांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही माहिती पोलीस निरीक्षक गुंजवटे यांनी दिली.

वाचा:

व्हायरल क्लिपमध्ये दिसत असलेल्या अन्य आरोपींचा शोध पोलिसांनी सुरूच ठेवला आहे. या घटनेत मंगळवारी सकाळी ८ वाजता यांना त्यांच्या वस्तीवर जाऊन बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे हात बांधून ३ किलोमीटर धिंड काढून त्यांना गावात आणण्यात आले होते. यानंतर त्यांना गावात एका झाडाला बांधून पुन्हा गावकऱ्यांदेखत मारहाण करण्यात आली होती. यावेळी सगळे गावकरी समोर असूनही कोणीच त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. याची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने घटनास्थळी जात पोलिसांनी त्यांची सुटका केली. यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली आणि १० आरोपींना तातडीने अटक करण्यात आली. यात गावातील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांसह मुलीच्या कुटुंबातील वडील, भाऊ , चुलते, चुलत भाऊ यांनाही मारहाण प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणातील एक महिला व एक अल्पवयीन मुलाचा पोलीस शोध घेत आहेत. व्हायरल झालेल्या क्लिपमधून इतर आरोपींना शोधण्याची मोहीमही वेगाने सुरू झाली असून सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी गावात भेट देऊन अधिक माहिती घेतली.

वाचा:

काय आहे प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाळवणी गावातील या तरुणाचे गावातील दुसऱ्या जातीच्या मुलीवर प्रेम होते. दोघांनीही ४ ऑगस्ट रोजी पळून जाऊन लग्न केले व दोघे मंगळवेढा पोलीस ठाण्यात हजर झाले होते. यानंतर दोन्हीकडील कुटुंबीय पोलिसांसमोर एकत्र येत हे प्रकरण मिटवले होते. त्यानंतर या नवविवाहित दाम्पत्याला गावातचा एका पाहुण्यांकडे मुक्कामाला ठेवण्यात आले होते. दरम्यान हे दाम्पत्य ७ ऑगस्ट रोजी पुण्याला नोकरीसाठी निघून गेले आणि त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. मुलाच्या वडिलांनी मुलीकडील मोठ्या जावयाला फोन करून मुलाकडे लक्ष देण्याची विनंती केली. मात्र तू आमच्या जावयाला फोन का केला, असा सवाल करीत मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या वडिलांना अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर त्यांचे हात बांधून त्यांना गावात आणण्यात आलं. तसेच गावात एका झाडाला बांधून त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. या प्रकरणामुळे बरकडे कुटुंब दहशतीखाली असून सैन्यदलात असणाऱ्या थोरल्या मुलाची पत्नी व तान्हे बाळ देखील घरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. आपल्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याचे मुलाची आई सांगत असून आमचा मुलगा सीमेवर रक्षण करतोय, आमचे रक्षण पोलिसांनी करावे अशी मागणी त्या करीत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here