सोन्या-चांदीच्या दरात घसरण
आजच्या व्यवहार सत्राच्या सुरुवातीला MCX वर सोन्याचा जून फ्युचर्स ४५ रुपयांनी घसरून ६१,२२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीचा जुलै वायदा १५६ रुपयांनी घसरून ७६,५३२ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता. अशा परिस्थिती सध्या दोन्ही मौल्यवान धातू उच्चांकी पातळीपेक्षा स्वस्त किंमती खरेदीसाठी उपलब्ध आहे. लक्षात घ्या की सोन्या-चांदीचे दर MCX आणि आंतरराष्ट्रीय बाजारात करमुक्त आहेत, त्यामुळे देशातील बाजारातील दरांमध्ये तफावत दिसून येते.
दरम्यान, गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा जून फ्युचर्स ६१,२७० रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिरावला, तर चांदीचा जुलै वायदा प्रति किलो ७६,६८८ रुपयांवर बंद झाला होता. यापूर्वी ४ मे २०२३ रोजी सोन्याची प्रति तोळा किंमत सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती. त्या दिवशी सोन्याचा भाव ६१,६४६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याच वेळी, चांदी सर्वोच्च स्तरावरून ३७१९ रुपये प्रति किलो स्वस्त झाली असून चांदीचा प्रति किलो सर्वकालीन उच्चांक ७९,९८० रुपये आहे.
जागतिक बाजारातील सोन्या-चांदीचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली आहे. स्पॉट गोल्ड ३.९५ डॉलरने घसरून $२,०३१.४५ प्रति औंसवर व्यवहार करत होते. तर स्पॉट चांदीची किंमत $०.३० च्या कमजोरीसह $२५.३४ प्रति औंसवर घसरली आहे. काल अमेरिकेतील महागाईचे आकडे जाहीर झाले, जे जागतिक कमोडिटी मार्केटमधील मंदीचे कारण मानले जात आहे. अमेरिकेतील महागाई दर दोन वर्षानंतर ५% खाली घसरला आहे.