संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?
नांदेड दौऱ्यावर असताना संभाजीराजे यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर भाष्य केलं. राजकीय स्थितीवर वेगळ्या विचारपीठावरुन बोलणार आहे. राज्यात जी काही स्थिती आहे ती बरोबर नाही. राजकारण खालच्या पातळीवर पोहोचलेलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकांच्या विकासाची भाषा बोलण्यापेक्षा माझं तुझं सुरु आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे. अवकाळी पावसानं नुकसान झालं पण आमदार खासदार पोहोचलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या नुकसानाचा पंचनामा देखील झालेला नाही. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. गरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लाँग टर्म योजना तयार केली पाहिजे. शेतकऱ्यांकडे आमदार गेलेला नाही, खासदार गेलेला नाही, सरकारी अधिकारी गेलेला नाही, ही दुर्दैवी बाब आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती राज्याच्या दौऱ्यावर
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राजकारण करणार असल्याचं म्हटलं. संभाजीराजे छत्रपती गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागात दौरा करत आहेत. या दौऱ्याच्या निमित्तानं ते तिथल्या जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. नांदेडमध्ये आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. संभाजीराजे छत्रपती यांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे.