मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आपले नातू व अजित पवारांचे पुत्र पार्थ यांना जाहीररित्या झापल्यानंतर पवार कुटुंबातील मतभेदाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षानं या संपूर्ण प्रकरणावर थेट काहीही बोलणं टाळलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

यांच्या आत्महत्येच्या संदर्भात विरोधकांच्या सुरात सूर मिसळत यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तसं निवेदन त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं. त्यामुळं आधीपासूनच ही मागणी करणाऱ्या विरोधकांना बळ आलं होतं आणि सरकारची गोची झाली होती. त्यानंतर अयोध्येतील राम मंदिराच्या संदर्भातही पार्थ यांनी पक्षाशी विसंगत भूमिका मांडली होती. त्यातूनही चर्चेला उधाण आलं होतं. या सगळ्या घडामोडींवर बोलताना शरद पवार यांनी बुधवारी पार्थ यांना जाहीररित्या फटकारलं. पार्थच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अपरिपक्व आहे,’ असं पवार म्हणाले होते. त्यातून पवार कुटुंबातील मतभेदांच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना पवारांच्या वक्तव्यावर थेट काही बोलणं टाळलं. ‘आजोबा आणि नातवातला जो काही वाद, विवाद, संवाद आहे. त्यात आम्ही का बोलायचं? तो त्यांच्या घरचा प्रश्न आहे, असं फडणवीस म्हणाले. ‘आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे आणि नातवानं आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवानं ठरवायचं आहे. त्या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही,’ असा चिमटाही त्यांनी काढला. मात्र, सुशांतसिंहच्या प्रकरणात सीबीआय चौकशी करायची असेल तर माझी हरकत नाही हे पवारांनी स्पष्ट केलंय एवढं मात्र खरं, हेही सांगायला फडणवीस विसरले नाहीत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here