मॅनकाइंड फार्मचा आयपीओ सूचिबद्ध
कंपनीचे शेअर्स मंगळवारी स्टॉक एक्स्चेंजमध्ये यशस्वीरित्या सूचिबद्ध झाले. कंपनीने अलीकडेच प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) लाँन्च केला होता. मॅनकाइंड फार्मा ही विविध फार्मास्युटिकल्स उत्पादनांची उत्पादक आहे. दरम्यान, दिल्ली कार्यालयात आयकर विभागाच्या छाप्याच्या वृत्ताचा कंपनीच्या शेअर्सवरही परिणाम झाला. आजच्या व्यवहार सत्रात कंपनीचे शेअर्स ५.५% पर्यंत घसरले. याशिवाय सकाळी ११ च्या सुमारास १.६६% घसरून १,३५९ रुपयांवर व्यवहार करत होते.
मॅनकाइंड फार्म शेअर्सचे लिस्टिंग
मंगळवारी मॅनकाइंड फार्मा या फार्मा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध झाले. स्टॉक त्याच्या आयपीओ इश्यू किमतीच्या २०% प्रीमियमवर सूचीबद्ध झाला. मॅनकाइंड फार्मा IPO २५ ते २७ एप्रिल दरम्यान खुला होता, तर किंमत बँड रु. १०२६-१०८०/शेअर होती. दरम्यान संपूर्ण IPO चा आकार ४,३२६.३६ कोटी रुपये होते. अशा प्रकारे मॅनकाइंड फार्माच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी मोठा फायदा झाला. मंगळवारी बाजारात धमाकेदार लिस्टिंग झाले तर बाजार बंद होताना कंपनीचा शेअर १,०८० रुपये अशा इश्यू किमतीच्या ३२% हून अधिक उसळी घेत बंद झाला.
सन १९९५ मध्ये स्थापित मॅनकाइंड फार्मा ही मॅनफोर्स कंडोम, गर्भधारणा चाचणी किट प्रेगा न्यूज सारखी उत्पादने तयार करणारी एक आघाडीची फार्मा क्षेत्रातील कंपनी असून रमेश जुनेजा त्याचे संस्थापक आहेत. मॅनकाइंड फार्माचे संपूर्ण लक्ष देशांतर्गत बाजारावर आहे. आर्थिक वर्ष २०२ च्या आकडेवारीनुसार कंपनीच्या एकूण महसुलात देशांतर्गत बाजाराचा वाटा ९७.६०% आहे. कंपनीने फार्मास्युटिकल्स व्यवसायात ३६ ब्रँड विकसित केले आहेत.