क्रिप्टोक्वीन म्हणून ओळखल्या जाणार्या रुजा इग्नाटोवाचा अमेरिकेची मोठी तपास यंत्रणा एफबीआयने टॉप मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश केला आहे. रुजा इग्नाटोवावर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली ३२,००० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
कोण आहे रुजा इग्नाटोवा?
१९८० मध्ये बल्गेरियाच्या सोफिया येथे जन्मलेली इग्नाटोवा वयाच्या १० व्या वर्षी कुटुंबासह जर्मनीला स्थायिक झाली. २००५ मध्ये रुजाने कॉन्स्टान्झ विद्यापीठातून कायद्यात डॉक्टरेट मिळवली. यानंतर रुजाने मॅकिन्से अँड कंपनी जॉईन करून मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सुरू केली. ही कंपनी स्वतः जगात अव्वल स्थानावर आहे.
जगभर बिटकॉइनचे यश पाहून रुजाने OneCoin लाँच केले आणि दावा केला की एकेकाळी OneCoin ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बनेल आणि लोक त्यातून अनेक पटींनी नफा कमावतील. रुजा इग्नाटोवाच्या कंपनीने क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी इतरांना प्रलोभन देण्यासाठी एजंटना कमिशन ऑफर केले, असे आरोप करण्यात आले आहे.
२०१४ मध्ये OneCoin लाँच केले
आपल्या वैद्यकीय कंपनीत काम करत रुजाने २०१४ मध्ये ‘OneCoin’ लाँन्च केले, जी एक क्रिप्टोकरन्सी होती. त्या वेळी जगभरात क्रिप्टोची चर्चा रंगली होती. लोकांना माहिती होती, पण अर्धी. खरेदी सुरू झाली होतीपण काही सेंटआणि पैशांसाठी.त्यावेळी बिटकॉइन प्रचलित असले तरी फक्त क्रिप्टोचे ज्ञान असलेले लोकच ते विकत घेत होते. रुजाने बाजारात OneCoin लाँच केले आणि काही वेळातच तिचे चलन ‘बिटकॉइन किलर’ बनले.
फक्त सार्वजनिक मंचावरच नाही रुजा तिच्या क्रिप्टोची कॉन्फरन्समध्येही प्रचार करायची. रुजाने जगाचा एकही कोपरा सोडला नाही जिथे तिने OneCoin ची खासियत सांगितली नाही. अगदी वेम्बली स्टेडियमवर एक परिषद आयोजित करण्यात आली होती आणि OneCoin वर चर्चा झाली होती. रुजा इग्नाटोवाचे व्यक्तिमत्त्व कोणत्या प्रकारचे असावे हे यावरून समजू शकते.
लूट कशी झाली?
रुजा इग्नाटोव्हाने जगातील गुंतवणूकदारांना आमंत्रित केले आणि पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज OneCoin क्रिप्टोकरन्सी खाण करणे आणि त्यावर पॅकेज मिळवण्यासाठी होते. OneCoin ची किंमत एका वेबसाइटवर दर्शविली गेली. वेबसाइटवर OneCoin ची किंमत जानेवारी २०१५ मध्ये £०.४३ होती, जी २०१९ मध्ये £२५ वर पोहोचली. हा कोणत्याही वास्तविक व्यवहारावर आधारित डेटा नव्हता, परंतु तरीही लोकांना या क्रिप्टोचे वेड लागले. चलनाची मालकी सामान्य डेटाबेसमध्ये ठेवली जायची. त्यावेळी चलनाचे कोणतेही ब्लॉकचेन किंवा डिजिटल लेजर नसून हे एका पॉन्झी योजनेसारखे होते ज्यामध्ये लोकांना क्रिप्टो विकायचे असल्यास पैसे पाठवले जात होते.
हळूहळू OneCoin बद्दल जागतिक नियमकांमध्ये मतभेद होऊ लागले. यामध्ये घोटाळा होऊ शकतो, असेही नियमकांनी सांगितले. पण इशारा देऊनही रुजाचे लोकांमधील आकर्षण इतके होते की लोक OneCoin मध्ये गुंतवणूक करत राहिले. २०१७ मध्ये अचानक रुजा गायब झाली. अनेक वर्ष तिचा शोध न लागल्यावर यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या वॉन्टेड लिस्टमध्ये तिचा समावेश करण्यात आला. तर रुजाचा भाऊ कॉन्स्टँटिनवर फसवणुकीचा आरोप असून त्याला दोषी ठरवण्यात आले. त्याच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप ठेवण्यात आले.
१२ अब्ज डॉलरची लूट
अमेरिकन प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, २०१४ आणि २०१७ या काळात OneCoin ने किमान $४ अब्ज जमा केले. तर काही लोकांचा असा विश्वास आहे की ही रक्कम १२ अब्ज डॉलर्सपर्यंत (सुमारे ९० हजार कोटी रुपये) असू शकते.