मुंबई : देशपातळीवर विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणारे बिहारचे मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते नितीश कुमार यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भाजप देशहिताच्या विरोधात काम करत असल्याने आता विरोधकांनी एकी दाखवून भाजपविरोधात खंबीरपणे लढण्याची गरज असल्याचं मत बोलून दाखवलं. तसेच विरोधकांच्या एकीसाठी आपण शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली, विरोधी आघाडीचा ते चेहरा (पंतप्रधान) असणार का? या बहुप्रतिक्षित प्रश्नाचं उत्तरही नितीश कुमार यांनी दिलं. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मत व्यक्त करताना शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावरुन तिरकस प्रतिक्रिया दिली.सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या अनुषंगाने निकालाचं वाचन सुरु होतं. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव ‘मातोश्री’ला पोहोचले. नितीश कुमार-तेजस्वी यादव आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. तिथून नितीश कुमार शरद पवार यांना भेटण्यासाठी ‘सिल्वर ओक’ येथे गेले. तिथे पवारांशी त्यांनी जवळपास एक तास चर्चा केली. त्यानंतरही पवारांसोबत नितीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली.

Supreme Court Verdict Maharashtra Crisis: उद्धव ठाकरेंचा राजीनामा महागात पडला, शिंदे सरकार वाचलं
शरद पवार काय म्हणाले??

आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भेटले. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव भेटले. विरोधकांची एकी राहणं गरजेचं असल्याचं आजच्या बैठकीत एकमत झालं. कर्नाटकमध्ये तेथील जनता धर्मनिरपेक्ष सरकार आणण्यासाठी आग्रही आहे, हे एक्झिट पोलमधून दिसून येतंय. नितीश कुमार-राहुल गांधी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक नवी दिल्लीत झाली होती. त्यावेळीही विरोधी पक्षांच्या रणनितीवर आमची चर्चा झाली होती. भाजपविरोधात विरोधक पूर्ण ताकदीने काम करतील.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर…. सर्वोच्च न्यायालयाने निकालात काय काय म्हटलं?
जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर महाराष्ट्रात राज्यात पुन्हा त्यांचं सरकार आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता आले असते, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. त्यावर शरद पवार म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर बोलण्यात आता काहीच अर्थ नाही. मला जे बोलायचं होतं ते मी माझ्या पुस्तकात बोललोय. पण जे झालं ते झालं आता उद्धव ठाकरे-आम्ही आणि काँग्रेस ताकदीने काम करु”

महाराष्ट्रातलं सरकार स्थापन करतावेळी राज्यपालांची भूमिका चुकीचीच होती. राज्यकर्त्यांविरोधात न्यायालयाने तीव्र भूमिका मांडली. पण नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे, असं वाटत नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय येणं बाकी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

तुमचं सरकार बेकायदेशीर यावर कोर्टाचं शिक्कामोर्तब, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : संजय राऊत
पवार पंतप्रधान होतील? नितीश कुमार म्हणाले…

त्याचवेळी भाजप देशहिताच्या विरोधात काम करतंय. त्यामुळे विरोधी पक्षांनी एकत्र यावं, यासाठी माझा प्रयत्न असल्याचं सांगताना विरोधी आघाडीचा चेहरा म्हणून जर शरद पवार पुढे आले तर मला अधिक आनंद होईल, असं नितीश कुमार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here