सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावर अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी पक्षाशी विसंगत भूमिका मांडली होती. त्यामुळं राष्ट्रवादीची कोंडी झाली होती. शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही कोंडी फोडली. ‘पार्थ पवार अपरिपक्व आहे. त्याच्या मताला आम्ही कवडीची किंमत देत नाही,’ असं पवार म्हणाले होते. त्यावरून पवार कुटुंबातील वादाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी थेट पार्थ पवारांची पाठराखण केली आहे. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष शौमिका महाडिक यांनी थेट शरद पवारांनाच टोला हाणला आहे.
वाचा:
शौमिका महाडिक या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. त्यांनी याआधी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदही भूषवलं आहे. भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत. महाडिक यांनी पवारांच्या वक्तव्याच्या अनुषंगानं दोन ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, ‘आज गोपाळकाला आहे. महाभारतामध्ये कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या ‘पार्थ’चे युद्धात ज्याने सारथ्य केले. त्या श्रीकृष्णाचा दिवस..!
वाचा:
पहिल्या ट्वीटनंतर महाडिक यांनी लगेचच दुसरं ट्वीट केलं. त्यात त्या म्हणतात, ‘मगाशी एका ट्वीटमध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला. माणसाकडून चुका होतात. जेमतेम दोन ते तीन मिनिटांत चूक कळताच मी ती सुधारली. पण तरीही मी चुकले हे मला बिलकुल मान्य आहे. मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही.’
महाडिक यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर केलेल्या या टीकेची जोरदार चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I like the valuable information you provide in your articles.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.