झोपडीला लागलेली आग शेर मोहम्मद यांच्या घरापर्यंत पोहोचली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग पसरली आणि तिनं मोहम्मदच्या घराला कवेत घेतलं. त्यावेळी मोहम्मद घरात झोपले होते. त्यांना काही कळायच्या आत घराबाहेरील झोपडीला आग लागली. तेव्हा गावात आरडाओरडा सुरू झाला. आगीच्या ज्वाळांची धग आतमध्ये झोपलेल्या मोहम्मद यांच्या कुटुंबीयापर्यंत पोहोचली. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र बाहेर पडण्याचा रस्ता बंद झाला होता.
मोहम्मद यांची आई आणि चार मुलगी एका खोलीत लपल्या. तर आजी, आजोबा आणि एका मुलीनं दुसऱ्या खोलीत आश्रय घेतला. आई आणि मुली लपलेल्या खोलीत सामान अधिक असल्यानं संपूर्ण खोलीत आग पसरली. त्यामुळे पाच जण जिवंत जळाले. तर दुसऱ्या खोलीत आश्रय घेतलेले तिघे जण होरपळले.
मोहम्मद यांच्या डोळ्यांदेखत घर आणि कुटुंब जळालं. ते पाहून मोहम्मद ओक्साबोक्सी रडू लागले. रडता रडता ते अनेकदा बेशुद्ध पडले. ग्रामस्थांनी प्रयत्नांची शिकस्त करुन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत शेर मोहम्मद यांच्या पत्नी आणि चार मुलींचा होरपळून मृत्यू झाला होता. मोहम्मद यांचे आजोबा सदीफ, आजी मोतीराणी आणि मुलगी कुससुम गंभीररित्या भाजली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.