नवी दिल्ली: आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३चे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होत आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार वर्ल्डकपची सुरूवात पाच ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या लढतीने होईल. या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ देखील भारतात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत आणि त्यांची लढत १५ ऑक्टोबर रोजी होऊ शकते.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मॅचची वाट संपूर्ण जगातील क्रिकेट प्रेमी पाहत असतात. दोन्ही देशातील खराब राजकीय संबंधांमुळे आयसीसीच्या स्पर्धा आणि आशिया कप वगळता या दोन्ही देशात सामने होत नाहीत. दोन्ही संघ जेव्हा मैदानात असतात तेव्हा संपूर्ण जगाची नजर या लढतीवर असते. या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक-दोन नव्हे तर पाच लढती होऊ शकतात. जाणून घ्या…

IPL 2023: धावांचा डोंगर उभा करण्यासाठी जीवाचे रान केले; उटली करत पोहोचला पॅव्हेलियनमध्ये…
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली लढत आशिया कप २०२३ मध्ये होणार. ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले नाही. ही स्पर्धा वनडे फॉर्मेटमध्ये असेल आणि यात ६ संघ असतील. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ हे संघ असतील ज्यांना दोन गटात विभागले जाईल. मीडिया रिपोटनुसार भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असतील. यानुसार ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघ एक मॅच खेळले. सुपर फोरमध्ये प्रत्येक गटातून दोन संघ येतील. ज्यात ४ संघात राउंड रॉबिन फॉर्मेटमध्ये ६ लढती होतील. आणि मग दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. फायनलसह स्पर्धेत १३ मॅच होतील.

भारत-पाकिस्तान यांच्यात ग्रुप फेरीत एक लढत निश्चित आहे. हे दोन्ही संघ सुपर फ्रोरमध्ये पोहोचतील. तेथे पुन्हा एक लढत होईल. दोन्ही संघांचा फॉर्म पाहता त्यांच्यात फायनल मॅच देखील होऊ शकते. एकूण आशिया कपमध्ये या दोन्ही संघात ३ मॅच होण्याची शक्यता दिसते.

ODI World Cup 2023: भारत-पाकिस्तान मॅचची तारीख ठरली; वनडे वर्ल्डकपच्या वेळापत्रकाबाबत आली मोठी अपडेट
आशिया कप झाल्यानंतर वनडे वर्ल्डकप असेल. ज्यात दोन्ही संघाची एक मॅच साखळी फेरीत होईल. स्पर्धेत दोन्ही संघांनी दमदार कामगिरी केली तर सेमीफायनल किंवा फायनलमध्ये यांची पुन्हा एकदा लढत होऊ शकते. आशिया कप आणि वर्ल्डकप मिळून भारत-पाकिस्तान यांच्यात ५ लढती पहायला मिळू शकतील.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१२-१३ मध्ये अखेरची द्विपक्षीय मालिका झाली होती. तेव्हा पाकचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यातील टी-२० मालिका बरोबरीत सुटली होती तर वनडे मालिका पाकिस्तानने जिंकली होती.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here