नवी दिल्ली : परकीय चलन दर आणि आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमतीनुसार तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता किमती सुधारित करतात. अशा स्थितीत तुमच्या गाडीची टाकी भरण्यापूर्वी आजचा नवा दरही जाणून घ्या. शुक्रवारी भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जुन्या किमतींवर स्थिर राहिले आहेत. मे २०२२ नंतर देश पातळीवर वाहन इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारने गेल्या किमतीत सुधारणा केल्यापासून तेलाच्या किमती स्थिर आहेत.

जागतिक बाजारात क्रूड ऑइलचा भाव
आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत १ डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त घसरण नोंदवली गेली. ब्रेंट क्रूडची किंमत जवळपास $७५ पर्यंत खाली आली असून आज सकाळी जाहीर झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. नोएडा-गाझियाबादसह अनेक शहरांमध्ये आज तेलाच्या किमती वाढल्या आहेत. दुसरीकडे, मुंबईत अजूनही पेट्रोलसाठी प्रति लिटर १०० रुपयेपेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे.

शेअर लिस्टिंगच्या तिसऱ्या दिवशी Mankind फार्मावर मोठी कारवाई, कंपनीवर आयकर विभागाची छापेमारी
मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे. स्थानिक राज्य करानुसार इंधनाचे दर बदलतात. दररोज सकाळी वाहन इंधनचे दर सुधारित केले जातात. स्थानिक कर, मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि मालवाहतूक शुल्क यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात.

तेलाच्या किमती दररोज अपडेट होतात
यापूर्वी दर १५ दिवसांनी इंधनाचे दर अपडेट केल्या जायच्या, पण २०१४ मध्ये सरकारने किमती नियंत्रणमुक्त केल्या आणि २०१७ पासून इंधनाच्या किमती दररोज अपडेट होणे सुरू झाले. केंद्राने एप्रिलमध्ये नैसर्गिक वायूच्या किंमतीचे सूत्र देखील बदलले, त्यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत घरगुती घरांमध्ये सीएनजी आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती ६ रुपयांनी घसरल्या.

भारतीय अब्जाधीश गॅरेजमध्ये राहिले, चपाती अन् पाण्यावर दिवस काढले, पाहा परिस्थिती कशी बदलली
अमेरिकेत तेलाच्या किमती बेलगाम
अमेरिकेतील इंधनाच्या मागणीमुळे गुरुवारी सुरुवातीच्या आशियाई व्यापारात तेलाच्या किमती वाढल्या. ब्रेंट क्रूड फ्युचर्स २६ सेंट्स किंवा ०.३४% वाढून $७६.६७ प्रति बॅरल झाले. तर यूएस क्रूड फ्युचर्स २८ सेंटने वाढून $७२.८४ वर पोहोचले.

डिझेलसाठी बीड बस डेपोकडे पैसेच नाही; ८२ पैकी फक्त २० बसेस सुरु; प्रवाशांची तारांबळ अन् संताप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here