मुंबई: राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या विभागातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेने ही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर, पुण्यातही तापमान वाढलं आहे. आज पुण्यातील तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या पुढे असेल, तर मुंबईत ३६ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान असेल. तर पुढील ७२ तासांत यंदाच्या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.जळगाव सर्वाधिक उष्ण शहर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणाच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळाल्या. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट तर कधी वादळी वारे, यामुळे उन्हाळ्यातही पावसाळा जाणवू लागला होता. मात्र, आता राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाचे चटके जाणवत आहेत. राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली असून सलग दुसऱ्या दिवशी हंगामातील उच्चांकाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक ४४. ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ही जळगाव शहरात झाली आहे.

ना राहायला घर, ना खायला पैसे; डोळे बंद करुन एक निर्णय घेतला अन् झाली ४१ कोटींची मालकीण
पुणं तापलं

तापमानात झालेल्या वाढीमुळे दिवसा बाहेर पडणं कठीण झालं आहे. रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. राज्याप्रमाणेच पुण्यातही तापमानात वाढ झाली आहे. ११ मे रोजी पुणे शहरातील कमाल तापमानाने उच्चांक गाठला आहे. तर, पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

लाखोंचा खर्च करून कांद्याला कवडीमोल दर; शेतकऱ्यांनी फिरवला कांद्यावर नांगर

पुढील ७२ तासात राज्यात उच्चकांनी तापमान नोंद होणार; हवामान विभागाचे अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी वर्तवला अंदाज

रोज वाढत्या तापमान पाहता राज्याच्या कमाल तापमानामध्ये येणाऱ्या ७२ तासात सर्व उच्चांकी नोंद होणार आहे. उन्हाळ्याच वातावरण असताना, दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत जाणार आहे. येणाऱ्या मान्सून पर्यंत तापमान हा हळूहळू वाढतच असणार आहे. विदर्भातील जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४५ डिग्रीपर्यंत तापमान जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणून आता सर्वसामान्य नागरिकांना सर्वधिक काळजी घेण्याची गरज आहे.

तापमानात वाढ का?

अचानक तापमानात इतकी वाढ होण्याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात होणारे बदल. गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात मोचा वादळ सक्रिय झाले आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे.

१८ महिने वडिलांचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला, रोज त्यांच्याशी बोलायचा… कारण वाचून थरकाप उडेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here