नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (GST) कायद्यात मोठा बदल करण्यात आला आहे. याअंतर्गत आता ६५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना १ ऑगस्टपासून B2B व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक किंवा ई-इनव्हॉइस (चालन) जारी करावे लागणार आहेत. आत्तापर्यंत १० कोटी किंवा त्याहून अधिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना B2B व्यवहारांसाठी ई-इनव्हॉइस जारी करणे बंधनकारक होते.

वित्त मंत्रालयाने १० मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, B2B व्यवहारांसाठी ई-इनव्हॉइस तयार करण्याची मर्यादा १० कोटींवरून पाच कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. वरील नियम १ ऑगस्ट २०२३ रोजी लागू होणार असून वित्त मंत्रालयाने म्हटले की पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कोणत्याही करदात्याला B2B व्यवहारांसाठी ई-इनव्हॉइस जारी करणे अनिवार्य असेल.

व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, E-invoice अपलोड करण्याची अंतिम मुदत वाढली; वाचा सविस्तर
१ ऑगस्टपासून नवीन प्रणाली
डेलॉइट इंडिया पार्टनर लीडर अप्रत्यक्ष कर महेश जयसिंग म्हणाले की या घोषणेमुळे ई-इनव्हॉइसिंग अंतर्गत एमएसएमईची व्याप्ती वाढविली जाईल आणि त्यांना ई-इनव्हॉइसिंग लागू करणे आवश्यक असेल. त्यांनी पुढे सांगितले की कंपन्यांसाठी ई-इनव्हॉइस हे शाप ऐवजी वरदान ठरेल कारण ई-इनव्हॉइस तयार करणारे पुरवठादार त्याच आधारावर इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये योगदान देतात.

उल्लेखनीय आहे की ई-इनव्हॉइसिंग सुरुवातीला ५०० कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या मोठ्या कंपन्यांसाठी लागू करण्यात आले होते आणि तीन वर्षांत ही मर्यादा आता पाच कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

GST Collection: जीएसटी करसंकलनाचं रेकॉर्ड एप्रिल महिन्यात मोडलं, मोदी सरकारची दणक्यात कमाई, महाराष्ट्र टॉपवर
व्यापाऱ्यांना काय फायदा होईल
ई-इनव्हॉइसिंग प्रणालीमध्ये MSME क्षेत्राचा समावेश केल्याने खर्च कमी करण्यात त्रुटींचे तर्कसंगतीकरण, जलद बीजक प्रक्रिया सुनिश्चित करण्यात आणि दीर्घकालीन व्यावसायिक विवाद मर्यादित करण्यात मदत होईल. यामुळे व्यावसायिक परिसंस्थेला फायदा होईल. जीएसटी कायद्यांतर्गत १ ऑक्टोबर २०२० पासून ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी बिझनेस-टू-बिझनेस (B2B) व्यवहारांसाठी ई-इनव्हॉइसिंग अनिवार्य करण्यात आले आहे, जे नंतर १ जानेवारी २०२१ पासून १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढालीपर्यंत वाढवण्यात आले.

…तर पेट्रोल होईल ७५ रूपये लीटर ; ‘एसबीआय’ने सांगितला फॉर्म्युला

१ एप्रिल २०२१ पासून ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी B2B ई-इनव्हॉइस तयार करणे आवश्यक करण्यात आले होते, तर १ एप्रिल २०२२ पासून ही मर्यादा २० कोटी रुपये आणि १ ऑक्टोबर २०२२ पासून ही मर्यादा आणखी कमी करून १० कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here