नवी दिल्ली : सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सोन्याच्या दराला ब्रेक लागला असून चांदीचे दरही घसरले आहेत. अशाप्रकारे विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्याच्या किमती हळूहळू खाली घसरत आहे. सराफा बाजाराशिवाय आज मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही कमजोरीसह व्यवहार होताना दिसत आहे. इतर चलनांच्या तुलनेत डॉलरच्या मजबूतीमुळे आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली असून, त्याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावर दिसून येत आहे.सोन्या-चांदीची आजची किंमतएमसीएक्स सोन्याचा जून फ्युचर्स ९८ रुपये घसरून ६०,७९४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीचा जुलै वायदा ६५६ रुपयांनी घसरून ७३,१५२ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. दरम्यान, गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा जून फ्युचर्स ६०,८९२ रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिरावला होता. तर चांदीचा जुलै वायदा प्रति किलो ७३,८०८ रुपयांवर क्लोज झाला होता. दुसरीकडे, गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार मुंबईत २२ कॅरेट सोन्यासाठी आज खरेदीदारांना प्रति १० ग्रॅम ५६,९५० रुपये खर्च करावा लागेल. तर चांदीची प्रति किलो किंमत ७७,६०० रुपये आहे.जागतिक बाजारात सोन्या-चांदीचे दरआंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरातही आज घसरणीसह व्यवहार होत आहे. स्पॉट गोल्ड $४.९५ ने घसरून $२,०११.३४ प्रति औंसवर व्यवहार करत असून स्पॉट सिल्व्हर $०.१४ घसरून $२४.०२ प्रति औंस झाली आहे.सोन्या-चांदीची शुद्धता कशी तपासायची?सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन) द्वारे हॉलमार्क जारी केले जातात. २४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर ९९९, तर २३ कॅरेटवर ९५८, २२ कॅरेटवर ९१६, २१ कॅरेटवर ८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० लिहिलेले असते. २४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध असते पण सोन्याचे दागिने २२ कॅरेटमध्ये विकले जातात. तर काही लोक १८ कॅरेट सोन्याचे दागिनेही खरेदी करतात. कॅरेट २४ पेक्षा जास्त नसते आणि सोनं जितकं शुद्ध जितके जास्त पैसे तुम्हाला मोजावे लागतील.
Home Maharashtra Gold Price Today: ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरवाढीला ब्रेक, पाहा आजचा बाजारभाव