यशस्वी जैस्वालचं आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक
यशस्वी जैस्वालनं आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक आपल्या नावावर नोंदवलं आहे. यशस्वी जैस्वालनं केकेआरचा कप्तान नितीश राणा याला पहिल्याचं ओव्हरमध्ये २६ धावा काढल्या. पुढच्या ७ बॉलमध्ये एक सिक्स आणि तीन चौकार याच्या मदतीनं २४ धावा काढल्या आणि १३ बॉलमध्ये ५० धावा पूर्ण केल्या. यासह यशस्वी जैस्वालनं आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम त्यानं केला आहे. त्या १३ बॉलमध्ये यशस्वीनं ६,६,४,४,२,४,१,४,६,४,४,४,१ अशा प्रकारे ५० धावा पूर्ण केल्या.
यशस्वी जैस्वालनं नितीश राणाला पहिल्या ओव्हरमध्ये २६ धावा काढल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्षित राणाला एकूण ११ धावा काढल्या त्यातील अखेरच्या दोन बॉलमध्ये १० धावा काढल्या. त्यानंतर पुढील ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरला सलग तीन चौकार लगावले. त्यानंतर एक रन घेत त्यानं ५० धावा पूर्ण केल्या.
युवराज सिंग आणि ख्रिस गेलचा विक्रम मोडण्याची संधी हुकली
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल आणि हजरतुल्लाह जजई यांच्या नावावर टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. युवराज सिंगनं २००७ मध्ये पहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंड विरोधात १२ बॉलमध्ये ५० धावा केल्या होत्या. तर, ख्रिस गेलनं २०१६ मध्ये मेलबर्न रेनेगेडस कडून खेळताना अॅडिलेड स्ट्राईकर्स विरुद्ध १२ बॉलमध्ये ५० धावा केल्या होत्या. हजरतुल्लाह जजई यानं काबुल जवानन कडून खेळताना बल्क लिजंडस विरुद्ध २०१८ मध्ये १२ बॉलमध्ये ५० धावा केल्या होत्या.