जळगाव: जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील एका शेतात कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाच्या हाडांचा सांगाडा सापडला असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे.जळगाव शहरातील विद्या नगर येथील मनोज हरिश्चंद्र पाटील यांची जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारात गट नं ६८८ या ठिकाणी शेती आहे. मनोज पाटील हे मंगळवार, ९ मे रोजी नेहमीप्रमाणे दुपारी ४ वाजता त्यांच्या शेतात गेले होते. यादरम्यान, शेतातील बोअरिंगजवळ मनोज पाटील यांना एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या स्थितीतील हांडांचा सांगाडा आढळून आला. मनोज पाटील यांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले आणि पंचनामा केला.

Weather Update: मराठवाडा, विदर्भ, मुंबई-पुण्यात उष्णतेची लाट, ७२ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे
याबाबत बुधवार, १० मे रोजी शेतकरी मनोज पाटील यांच्या खबरीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे, त्याचा मृत्यू कसा झाला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरु असून मृताची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सायकर हे करीत आहेत.

मित्र-मैत्रिण फिरण्यासाठी गेले, रस्त्यातच नराधमांनी अडवलं, एकाने छेड काढली, दुसऱ्याने गोळी घातली

मयत व्यक्ती आणि त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

दरम्यान, या व्यक्तीचा गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मयत व्यक्ती कोण, तो या शेतात नेमका का आणि कशासाठी आला. कुजलेला मृतदेह तसेच हाडांच्या सांगड्यावरुन ओळख पटविण्याचे मोठे आव्हान तालुका पोलिसांसमोर आहे. तर दुसरीकडे, व्यक्तीने आत्महत्या केली की त्याच्यासोबत घातपात होवून त्याचा खून झाला. या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीत असून या प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी घटनेचा पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. दरम्यान, विविध गावांमधील नागरिकांकडून पोलिसांची चौकशी करण्यात सुरुवात केली आहे. तसेच, विविध पोलिस ठाण्यांमधील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे.

ना राहायला घर, ना खायला पैसे; डोळे बंद करुन एक निर्णय घेतला अन् झाली ४१ कोटींची मालकीण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here