न्यू जर्सी: कुटुंब घरात असताना घराचं छत तोडून एक दगड घरात पडला. हे घडताच कुटुंबीय हादरुन गेले. सुरुवातीला त्यांना असं वाटलं की हा एक सामान्य दगड आहे. पण, जेव्हा तज्ज्ञांनी याची तपासणी केली तेव्हा त्यांना कळालं की हा कुठला दगड नसून सुमारे ५ अब्ज जुनी उल्का आहे. हे प्रकरण अमेरिकेतील न्यू जर्सी येथील आहे.होपवेल पोलीस विभागाने या घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यात सांगण्यात आलं की, उल्का असल्याचं सांगण्यात येत असलेली धातूची वस्तू घराच्या छतावर आदळली आणि नंतर छत तोडून थेट बेडरूममध्ये पडली. ही वस्तू ४ ते ६ इंचाची आहे आणि सुमारे १.८ किलो वजनाची असल्याची माहिती आहे.
सीबीएस न्यूजनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी एकच्या सुमारास ही उल्का घराच्या छतावर पडली. ती वस्तू (उल्का) घराचे छत तोडून थेट बेडरूममध्ये पडली. सुरुवातीला कोणीतरी दगडफेक केली असावी असे वाटले. मात्र, मी वर पाहिले असता ती वस्तू छत तोडून बेडरुममध्ये पडल्याचं दिसलं. त्यावेळी कोणीही बेडरुममध्ये नव्हते हे नशीब, असं घराच्या मालकीण सुजी कॉप म्हणाल्या.

फ्रँकलिन इन्स्टिट्यूटचे मुख्य खगोलभौतिकशास्त्रज्ञ डेरिक पिट्स म्हणाले की, ५ अब्ज वर्ष जुनी उल्का सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळातील अवशेष असू शकते. ती आतापर्यंत अवकाशात फिरत होती आणि आता पृथ्वीवर पडली आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या आठवड्यात या परिसरात उल्का पडण्याचं प्रमाण (Eta Aquarids Meteor shower) मोठ्या प्रमाणात होतं.
सध्या या उल्कापिंडाचे परीक्षण केल्यानंतर त्यांना कळालं की यातून रेडियो अॅक्टिव्ह किरणोत्सर्ग होत नाहीये. याबाबत अग्निशमन विभागाने कोणताही धोका नसल्याचं सांगितलं आहे. जेव्हा उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते तेव्हा तीव्र तापमान आणि वेगामुळे ती जळते. बहुतेक उल्का या पृथ्वीच्या वातावरणात पूर्णपणे जळते तर काही या हवेतच नष्ट होतात. परंतु ज्या उल्का पूर्णपणे जळत नाहीत, त्यांचा उरलेला भाग पृथ्वीवर पडतो.