छत्रपती संभाजीनगर: फोन पेद्वारे पैसे पाठवताना चुकीचा नंबर टाइप केल्यानंतर एका महिलेला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. ही घटना वेदांत नगर येथे घडली. पीडित महिलेने ज्वेलर्स दुकानदाराचे पैसे फोन पे द्वारे पाठवले. मात्र मोबाईल क्रमांक टाईप करतांना २ ऐवजी ३ नंबर दबला. चुकून पैसे दुसऱ्या नंबर वर गेले. सराफा दुकानदाराला ही बाब सांगितल्यानंतर त्याने त्याचा मित्राचा नंबर दिला. ज्वेलर्स दुकानदार च्या मित्राने याचा गैरफायदा घेत महिलेला पैसे काढून देत तो म्हणत व्हिडिओ कॉल करायला सुरुवात केली. तू तुझ्या मुलाबाळांना सोडून माझ्याकडे ये, मी शिक्षक आहे. माझ्याकडे खूप पैसा आहे म्हणून अश्लील भाषेत संवाद साधत महिलेला त्रास दीला.दरम्यान घाबरलेल्या महिलेने कंटाळून आरोपी विरोधात वेदांत नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.योगेश पाटील (रा.चाळीसगाव) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी पीडितेने वेदानगर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिला वेदांत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कुटुंबीयांसोबत राहते. शहरातील एका ज्वेलर दुकानदारांसोबत त्या महिलेचा व्यवहार झाला महिलेला ज्वेलर्स दुकानदाराला ७,१५० रुपये ऑनलाईन पाठवायचे होते. यामुळे महिलेने फोन पे द्वारे ज्वेलर्स दुकानदाराला पैसे पाठवले.

काँग्रेसचे नेते संतोष रावत यांच्यावर गोळीबार, चंद्रपुरात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
मात्र पैसे पाठवताना महिलेकडून ज्वेलर्स दुकानदाराचा नंबर दोन ऐवजी तीन असा चुकून दबला आणि त्यामुळे पैसे दुसऱ्या व्यक्तीला गेले. ही बाब महिलेच्या लक्षात येताच महिलेने बँकेची संवाद साधला त्यावेळेला बाबू ननवरे (रा. चाळीसगाव) या व्यक्तीच्या खात्यामध्ये गेल्याचं लक्षात आलं. दरम्यान ही बाब त्या महिलेने ज्वेलरी दुकानदाराला सांगितली. ज्वेलरी दुकानदाराने महिलेला चाळीसगाव येथील योगेश पाटील नावाच्या मित्राचा नंबर दिला.

मुका- बहिरा असल्याचे भासवून डोळ्यासमोर केली चोरी, ५ दिवसांनंतर पोपटासारखा बोलला चोरटा
ज्वेलर्स दुकानदार व्यक्तीच्या चाळीसगाव येथील ओळखीच्या व्यक्तीचा नंबर मिळाल्यामुळे महिलेने संबंधित व्यक्तीला घडलेला सगळा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर योगेश पाटील यांनी मी पैसे काढून देतो असं महिलेला सांगितलं. महिलेने पैसे मिळवून देण्यासाठी फोन केल्याचा गैरफायदा घेत योगेश आणि महिलेची लगट करण्याचा प्रयत्न केला. तो महिलेला वारंवार व्हिडिओ कॉल करत असे, तसेच मुलीशी अश्लील संवाद साधत होता.

Atal Pension Yojna : जबरदस्त आहे ही सरकारी योजना, फक्त २१० रुपये गुंतवा, दरमहा मिळेल इतकी पेन्शन
दरम्यान संपूर्ण प्रकरणामुळे महिला घाबरली होती. महिलांनी त्या व्यक्तीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र योगेश पाटील काही एक एकूण घेत नव्हता. त्यानंतरही योगेश याचे कॉल सुरू होते. तू मुलाबाळांना सोडू नये, मी शिक्षक आहे माझ्याकडे खूप पैसा आहे असे आमिष तो महिलेला दाखवायचा. दरम्यान विवाहित महिला घाबरल्यामुळे महिलेने कुटुंबीयांच्या मदतीने वेदान नगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी योगेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here