Ahmednagar News: शिर्डी येथील साई बाबा संस्थानच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज १२ मे पासून मंदिर परिसरात कोणालाही चप्पल आणि बूट घालून प्रवेश करता येणार नाही.

या साईबाबा संस्थानचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवा शंकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या परीपत्रकात म्हटले आहे की, सर्व प्रशासकिय अधिकारी, अधिक्षक सर्व विभागाचे विभागप्रमुख कर्मचारी यांनी श्रींचे समाधी मंदिर व मंदिर परिसरात प्रवेश करतांना आपले पादत्राणे प्रत्येक प्रवेश व्दारा बाहेर पादत्राणे गृहावर (चप्पल स्टॅन्ड) ठेवूनच प्रवेश करावा. तसेच संरक्षण विभागाने साईभक्त (भाविक) व सर्व ग्रामस्थ यांना साईंच्या समाधी मंदिर व मंदिर परिसरात प्रवेश देतांना पादत्राणे प्रत्येक प्रवेश व्दारा बाहेर पादत्राणे गृहावर (चप्पल स्टॅन्ड) ठेवूनच प्रवेश द्यावा. सदर परिपत्रकाची कार्यवाही दिनांक १२/०५/२०२३ पासून तात्काळ करण्यात यावी असे, नमूद करण्यात आले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.