नवी दिल्ली : औषध कंपनी ”कडून () गुरुवारी संक्रमित रुग्णांवर उपचारासाठी वापरलं जाणारं ” हे (Remdesivir) औषध ‘रेमडेक’ या नावानं भारतीय बाजारात लॉन्च केलंय. उल्लेखनीय म्हणजे ‘रेमडेक’ ( Remdac) हे औषध ‘रेमडिसिवीर’पेक्षा स्वस्तात उपलब्ध होऊ शकणार आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, इंजेक्शनची १०० मिलीग्रामची बाटली २८०० रुपयांना उपलब्ध होऊ शकणार आहे.

आपल्या वितरण नेटवर्कद्वारे हे औषध संपूर्ण देशातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांत पुरवण्यात येणार असल्याचं ‘जायडस कॅडिला’ कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय.

कॅडिला हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शरविल पटेल यांच्या म्हणण्यानुसार, ‘रेमडेक सर्वात स्वस्त औषध आहे. करोनासारख्या आजारात जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हे औषध उपलब्ध व्हावं, अशी आमची इच्छा आहे’.

वाचा :

वाचा :

या औषध तयार करण्यासाठी सक्रीय फार्मास्युटिकल घटकांचं (एपीआय) उत्पादन कंपनीच्या गुजरात विभागात करण्यात आलंय. ‘जायडस कॅडिला’कडून कोविड १९ वर प्रभावी लस बनवण्याचाही प्रयत्न सुरू आहे. ‘जायकोव डी’ नावाची ही लस क्लिनिकल परीक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयानं वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत एकूण ४७,०३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील १६,९५,९८२ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत. देशात सध्या ६,५३,६२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशभरात गेल्या २४ तासांत ६६,९९९ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले तर केवल २४ तासांत ९४२ मृत्यू नोंदवले गेले. यासोबतच देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २३,९६,६३८ वर पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलीय.

वाचा :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here