सोयगाव : शीर धडा वेगळे झालेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत विहिरीत तरंगताना आढळून आल्याची घटना शुक्रवारी पहाटे आठ वाजता सोयगाव तालुक्यात बहुलखेडा शिवारात उघडकीस आली आहे. अविनाश उर्फ बंटी दगडू तडवी (वय १८ वर्षे, रा. कवली, ता सोयगाव) असे विहिरीत आढळलेल्या मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र धडा वेगळे झालेले शीर, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने पाण्यात गळून पडले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.बहुलखेडा शिवारातील सुरेश परमाणे रा.पिंपळगाव हरे (ता. पाचोरा) यांच्या गट क्र-१३८ मध्ये शुक्रवारी पहाटे विद्यार्थ्याचे शीर धडावेगळे असलेले आढळले आणि कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. कवली गावचे पोलीस पाटील निवृत्ती केंडे व बहुलखेड्याचे पोलीस पाटील चंद्रसिंग राठोड यांनी पोलिसांना तातडीने घटनेची माहिती दिली. त्यावरून सोयगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कारवाई केली. विहिरीत कुजलेल्या अवस्थेत शीर पाण्यात विहिरींच्या तळाशी गळून पडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

काय आक्रित घडलं?, पोलिसांनी बार्शीत गौतमी पाटीलचा शो बंद पाडला; चाहत्यांनी ऐकले फक्त एकच गाणे
दरम्यान घटनास्थळी मृतदेहाचे स्पॉट शवविच्छेदन करून नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी ते ताब्यात देऊन घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले.

हातातील कड्यावरून पटली ओळख

शीर धडावेगळे असलेला अविनाशचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढल्यावर त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान बेपत्ता असलेल्या लहान भावाचा मोठ्या भावासह नातेवाईकांकडून शोध सुरू होता. विहिरीत मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनी घटनास्थळ गाठलं. हातातील चांदीच्या कड्यावरून मृतांची ओळख पटविली आहे. तो अविनाश असल्याचे निष्पन्न झाले.

Akola Crime : वर्चस्वाच्या लढाईतून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू तर एक गंभीर
शवविच्छेदनासाठी पोलीस पाच तास ताटकळले

दरम्यान विहिरीत तरंगत असलेला कुजलेला मृतदेह बाहेर काढल्यावर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र सोयगाव ग्रामीण रुग्णालयासह जरंडी, बनोटी या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सर्जन न मिळाल्याने अखेरीस कन्नड तालुक्यातील नागद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ निकुंभ यांना शवविच्छेदनासाठी घटनास्थळी पाचारण करून शवविच्छेदन करण्यात आले. त्यामुळे पोलिसांना पाच तास घटनास्थळी ठाण मांडून बसावे लागले.

जालन्यात धक्कादायक घटना! पत्नीची हत्या करत पतीने स्वत:लाही संपविले, दोन चिमुरडी झाली पोरकी
बेपत्ता अविनाश याची ११ दिवसानंतर थेट मृत्यूची बातमी मिळाली

मृत अविनाश तडवी याने नुकतीच इयत्ता बारावीची परीक्षा दिलेली होती. तो १ मे पासून घरातून निघून गेलेला होता. ११ दिवसानंतर थेट त्याच्या मृत्यूची बातमी मिळाल्याने कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा होता. मृत अविनाशच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ एक बहीण असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू बर्डे रवींद्र तायडे आदी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here