जयपूर: राजस्थानात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला असून उद्या शुक्रवार पासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. महत्वाचे म्हणजे उद्याच सभागृहात गहलोत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याची घोषणा भारतीय जनता पक्षाने केली आहे. ही माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेता आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गुलाबचंद कटारिया यांनी दिली. हे पाहता राजस्थानातील गहलोत सरकारसमोर आता बहुमत सिद्ध करून दाखवण्याच मोठे अव्हान उभे ठाकले आहे.

गहलोत सरकार लवकरच कोसळणार- भाजप
काँग्रेस पक्ष आपल्या घरात टाके लावून कपडे जोडू पाहत आहे. मात्र कपडा फाटून गेला आहे. हे सरकार लवकरच कोसळणार आहे, असे भारतीय जनता पक्षाचे नेते गुलाबचंद कटारिया यांनी म्हटले आहे. हे सरकार आपल्याच अंतर्विरोधामुळे पडणार असून काँग्रेस उगाचच भारतीय जनता पक्षावर आरोप करत आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधील घरातील भांडणाशी भारतीय जनता पक्षाचे काहीएक देणे-घेणे नसल्याचेही ते म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here