सूर्यकुमार यादवनं त्याच्या आयपीएल करिअरमधील पहिलं शतक केलं. सूर्यकुमार यादवची ही खेळी सर्वांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिल. सूर्यकुमार यादवनं ४९ बॉलमध्ये १०० धावा पूर्ण केल्या. मुंबईच्या डावाच्या अखेरच्या ओव्हरमध्ये अखेरच्या बॉलवर षटकार खेचत सूर्यकुमारनं शतक पूर्ण केलं. सूर्यकुमार यादवच्या १०३ धावांच्या जोरावर मुंबईनं २१८ धावा केल्या होत्या.
सूर्यकुमारची वादळी खेळी
सूर्यकुमार यादवनं त्याच्या इनिंग्जमध्ये ११ चौकार आणि ६ सिक्सर लगावले. सूर्यानं मुंबईच्या दोन खेळाडूंसोबत ५० धावांची भागिदारी केली. विष्णू विनोदसोबत ४२ बॉलमध्ये ६२ धावांची भागिदारी सूर्यकुमारनं केली. त्यानंतर ६ व्या विकेटसाठी कॅमरुन ग्रीनसोबत १८ धावांमध्ये ५४ धावांची भागिदारी त्यानं केली. सूर्यानं अखेरच्या तीन ओव्हरमध्ये १५ बॉलमध्ये ५० धावा सूर्यकुमार यादवनं काढल्या.
मोहम्मद शमीच्या १९ व्या ओव्हरमध्ये सूर्यकुमारनं जो षटकार लगावला तो पाहून क्रिकेटचा देव असलेला सचिन तेंडूलकर देखील प्रतिक्रिया देण्यासापासून स्वत:ला रोखू शकला नाही. अखेरच्या ओव्हरमध्ये दोन षटकारांसह सूर्यकुमारनं शतक पूर्ण केलं.
सचिनची प्रतिक्रिया कशी होती?
सूर्यकुमार यादवनं मोहम्मद शमीच्या १९ व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर थर्ड मॅनला षटकार लगावला. सूर्यकुमार यादवच्या त्या षटकाराचां कौतुक करण्यापासून सचिन स्वत:ला रोखू शकला नाही. त्यानं सूर्याचा तो षटकार कसा गेला ते सचिननं पियुष चावलाला हातवारे करुन दाखवलं.
सचिन तेंडुलकरनं मॅच संपल्यानंतर ट्विट करुन सूर्याच्या फलंदाजीचं कौतुक केलं. सूर्यकुमारनं आज चांगले शॉट मारले. मात्र, मोहम्मद शमीच्या ओव्हरमध्ये थर्ड मॅनला मारलेल्या षटकाराचं त्यानं विशेष कौतुक केलं. सूर्या ज्या प्रकारे बॅटिंग करताना बॅटचा अँगल ब्लेडसारखा करतो ते खूप कठीण आहे. जगातील निवडक खेळाडूंना ते जमतं, असं सचिन म्हणाला. सचिनच्या ट्विटला मुंबई इंडियन्सकडून देखील रिप्लाय देण्यात आला.
दरम्यान, मुंबईनं दिलेलं २१८ धावांचं आव्हान पूर्ण करण्यात अपयश आल्यानं गुजरात टायटन्सचा पराभव झाला. गुजरातचा संघ २० ओव्हरमध्ये ८ बाद १९१ धावा करु शकला. त्यामध्ये राशिद खाननं वादळी बॅटिंग केली.