Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा शिवारातील विहिरीत एक तरुणाचा शिर धडावेगळे असलेला मृतदेह (Dead Body) तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. तर मृतदेहाची अवघ्या अर्ध्या तासात ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, मृतदेह कुजलेला अवस्थेत असल्याने शिर पाण्यात गळून पडले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. अविनाश उर्फ बंटी दगडू तडवी (वय 18, रा. कवली, ता. सोयगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे बहुलखेडा शिवारातील सुरेश परमाणे यांच्या शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह तरंगताना आढळून आला. याप्रकरणी कवली गावचे पोलीस पाटील निवृत्ती केंडे आणि बहुलखेड्याचे पोलिस पाटील चंद्रसिंग राठोड यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील कारवाई केली. दरम्यान, मृताचे धडावेगळे शिर असल्याने बहुलखेडा, कवली गावात खळबळ उडाली आहे. शिर विहिरींच्या तळाशी गळून पडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत अविनाश याने नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली होती. तर 1 मेपासून तो घरातून निघून गेलेला होता. मृतदेहाचे घटनास्थळीच शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या उपस्थित जागेवरच अंत्यसंस्कार करण्यात आले. 

1 मेपासून घरातून निघून गेला होता…

दरम्यान, अविनाश याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे परीक्षेच्या निकालाकडे त्याचे लक्ष होते. मात्र 1 मे रोजी अविनाश घरातून निघून गेला होता. तेव्हापासून नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याकडून त्याचा शोध घेतला जात होता. मात्र 10 ते 12 दिवस उलटून देखील तो मिळून आला नाही. दरम्यान शुक्रवारी बहुलखेडा शिवारातील सुरेश परमाणे यांच्या शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी अविनाशच्या कुटुंबातील सदस्यांना ओळख पटवण्यासाठी बोलावले होते. तर मृतदेह विहिरीबाहेर काढल्यावर अविनाशच्या मोठ्या भावाने त्याच्या उजव्या हातातील चांदीच्या कड्यावरून मृतांची ओळख पटविली.

शवविच्छेदनासाठी पोलिसांची पाच तास प्रतीक्षा

अविनाशचं विहिरीत तरंगत असलेला कुजलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयासह जरंडी, बनोटी या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सर्जन न मिळाल्याने अखेरीस कन्नड तालुक्यातील नागद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निकुंभ यांना शवविच्छेदनासाठी पाचारण करण्यात आले. त्यामुळे पोलिसांना पाच तास घटनास्थळी ठाण मांडून बसावे लागले होते. शेवटी दुपारी तीन वाजता अविनाशवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

news reels reels

इतर महत्वाच्या बातम्या :

Chhatrapati Sambhaji Nagar : चौकशीसाठी आलेल्या पोलिसावर चाकू हल्ला; संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पोलिसांवर हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here