मुंबई : आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. ते महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक होते. आंबेडकरी चळवळीतील विचारवंत आणि झुंजार लढवय्या म्हणून दलित पँथरमध्ये मनोज संसारे यांची ख्याती होती.मनोज संसारे हे मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक होते. दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणून मनोज संसारे यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. संसारेंच्या निधनाने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मनोज संसारे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पताका खांद्यावर घेऊन अन्यायाविरोधात अग्रेसर भूमिका मांडणारे नेते होते, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संसारेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शिक्षक म्हणून नोकरी, बाळासाहेबांच्या परिसस्पर्शाने राजकारणात प्रवेश, साधा नगरसेवक ते मुंबईचा महापौर

गेल्या काही दिवसांपासून मनोज संसारे यांची प्रकृती बिघडली होती. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. झुंजार नेतृत्व हरपल्याने आंबेडकरी समाज शोकसागरात बुडाला आहे.

जिवा महालांच्या वंशजाला मिसेस मुख्यमंत्र्यांची मदत, प्रतीक्षा महालेंच्या लग्नासाठी धनादेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here