बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर असून भाजप पिछाडीवर आहे. सध्याच्या कलाचं चित्र कायम राहिल्यास जेडीएस किंगमेकर होण्याची शक्यता आहे. सध्याच्या कलांनुसार काँग्रेसला मिळत असलेल्या जागा बहुमताच्या जवळ आहे. सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं काँग्रेस सक्रीय झालं आहे. काँग्रेसनं आपल्या उमेदवारांना बंगळुरुला आणण्याची तयारी सुरु केली आहे. सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं कर्नाटकमध्ये कर्नाटक, भाजप आणि जेडीएसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि जेडीएसमध्येही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेस सक्रिय, आमदारांना सुरक्षित स्थळी हटवणार

काँग्रेसनं कर्नाटकमधील सत्ता मिळवण्यासाठी राजकीय हालचाली वाढवल्या आहेत. कर्नाटकमधील विजयी उमेदवारांना सुरक्षित स्थळी पाठवण्यासाठी काँग्रेसनं हेलिकॉप्टर तयार ठेवल्याची माहिती आहे. काँग्रेसनं हैदराबादमध्ये हॉटेल बुक केल्याची माहिती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस सध्याच्या कलानुसार १११ जागांवर आघाडीवर आहे. भाजप ८२ जागांवर तर जेडीएस २६ वर आघाडीवर आहेत. ५ जागांवर इतर उमेदवार आघाडीवर आहेत. सध्याची स्थिती पाहता काँग्रेस सतर्क झाली असून आमदारांना सुरक्षित स्थळी पाठवणार आहे.
कर्नाटकचा आज निकाल; ‘जेडीएस’च्या हाती सत्तेच्या चाव्या? थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात

कर्नाटकमध्ये भाजप आणि जेडीएसची युती होणार?

काही एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार कर्नाटकमध्ये त्रिशंकु विधानसभा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली होती. कर्नाटकमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहील पण बहुमतापासून दूर राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठण्यास अपयश आल्यास भाजप आणि जेडीएस एकत्र येऊन सत्ता स्थापन करु शकतात, अशा देखील चर्चा आहेत. भाजप आणि जेडीएसमध्ये चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिल्याची माहिती आहे.

Karnataka Results: कर्नाटक निकालाच्या धामधुमीत भाजपच्या कार्यालयात साप शिरला, मुख्यमंत्री बोम्मईंनी घेतली धाव

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पराभव झाला असून त्यांनी तो स्वीकारला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी कर्नाटकमध्ये लोकशाहीची स्टोरी चालली, असं म्हटलं. कर्नाटकच्या जनतेनं खोके सरकारच्या लोकांना लाथाडून लावलं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Karnataka Election: कर्नाटकचा किंग कोण, कुणाची सत्ता येणार? मतदारांनी कुणाला कौल दिला,अशी पार पडणार मतमोजणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here