म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद: नातेवाईक विवाहितेला करून तिचे ५४ हजार रुपयांचे दागिने बळकावल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी सचिन सुभाष बरतूने (वय २८, रा. पद्‌मपुरा) याला वेदांतनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी दिले.

पद्‌मपुरा भागातील एका विवाहितेचे २०१३ मध्ये लग्न झाले. त्यानंतर पाच वर्षांनी तिचे कापड व्यावसायिक सचिन बरतुने याच्यासोबत प्रेम जुळले. त्यातून त्याने तिच्यासोबत काही फोटो काढले होते. त्यानंतर २०१८ मध्ये ही विवाहिता काही दिवस त्याच्यासोबत मुलीला घेऊन हैदराबादमध्ये राहिली. मात्र, कुटुंबियांनी समजूत काढल्यानंतर ती परत आली होती. या प्रकारानंतर बरतुने याने तिला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. दरम्यान पाच ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता ती घराबाहेरील बाथरुमला जावून परत येत असताना तेथे अचानक बरतून आला व त्याने विवाहितेला सोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देत तिच्याकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. या प्रकाराने घाबारलेल्या विवाहितेने घरातील ५४ हजार रुपयांचे दागिने त्याला दिले. या प्रकरणात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शनिवारपर्यंत कोठडी

संशयित आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीकडून सोन्याचे दागिने हस्तगत करणे आहे तसेच आरोपीने मोबाइलमध्ये विवाहितेसोबत फोटो काढले असून तो मोबाइल जप्त करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील योगश तुपे यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here