राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ७१० रुपयांनी घसरून ६०,९७० रुपयांपर्यंत खाली आला. तर मागील सत्रात सोन्याचा भाव ६१,६८० रुपये प्रति १० ग्रॅमवर क्लोज झाला होता. त्याच वेळी, चांदीचा भाव ७३,५०० रुपये प्रति किलोच्या पातळीवर घसरला. विशेष म्हणजे गेल्या आठवडाभर सोन्याच्या दरात चढउतार दिसून आले. तर आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव ६१,७३९ रुपयांवर बंद क्लोज झाला असून यासह या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ७०२ रुपयांनी घट झाली.
चांदीचा भाव २,६९० रुपयांनी घसरला
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार चांदीची किंमत प्रति किलो २,६९० रुपयांनी घसरली. त्यामुळे स्पॉट मार्केटमध्ये चांदीचा भाव ७३,४४५ रुपये प्रति किलोपर्यंत घसरला तर मागील सत्रात चांदीचा भाव ७६ हजार १३५ रुपये प्रति किलो होता. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस $२,००९ च्या पातळीवर घसरला असून चांदीची किंमत प्रति औंस २४.१० डॉलरवर घसरली.
भारतात सोन्याचे महत्त्व
सोने निर्यात करणाऱ्या देशांपैकी भारत एक असून देशभरात सोन्याच्या खरेदीला खूप महत्त्व आहे. प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी लोक सोने खरेदी करतात, त्यामुळे सोन्याच्या किमतीतील चढ-उताराकडे सर्वांच्या नजरा लागून असतात. सोन्याच्या खरेदीवर GST चार्जेस वेगळे भरावे लागतात. याशिवाय दागिन्यांवर मेकिंग चार्जही असते. दरम्यान, इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या प्रमाणित किमतीची माहिती देतात.
सोन्याच्या दरवाढीचे कारण काय?
अमेरिकेतील सध्याच्या बँकिंग संकटामुळे आर्थिक मंदीची भीती निर्माण झाली असून अमेरिकेतील बँकांची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत चालली आहे. अशा स्थितीत सोन्याच्या दरातील चमक वाढली आहे. सोने हा संकट काळाचा साथीदार मानला जातो, त्यामुळेच जगभरातील केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी सुरू केली असून सोन्यातील गुंतवणूक वेगाने वाढलेली आहे. तसेच शेअर बाजारातील घसरणीमुळे सोन्याच्या भावालाही आधार मिळाला आहे.