मावळ, पुणे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येने मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. दीड महिन्यांपूर्वी शिरगावचे राष्ट्रवादीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचीही अशीच हत्या झाली. त्यामुळे मावळमधील रक्तरंजीत इतिहासाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आवारे खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवारेंच्या हत्येनंतर आमदार सुनील शेळके यांच्या भावाची हत्येचीही चर्चा होतीये. १६ ऑक्टोबर २०१६ रोजी आमदार सुनील शेळके यांचे बंधू सचिन शेळके यांचीही अशीच हत्या झाली होती, अन् त्यावेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आवारे यांच्या खुनाने सचिन शेळके यांच्या खुनाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.नगराध्यक्ष राहिलेल्या सचिन शेळकेंचा खून झालाआमदार सुनील शेळके यांचे बंधू सचिन शेळके हे २०१६ साली भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक होते. वयाच्या अवघ्या ३८ वया वर्षी त्यांची भर रस्त्यात अज्ञात हल्लेखोरानी त्यांचा निर्घृण खून केला होता. हा खून ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाला होता. त्यावेळी सचिन शेळके यांच्यावर देखील पाळत ठेवून हा खून करण्यात आला होता. त्यावेळी आमदार बाळा भेगडे आमदार असताना त्यांनी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. सचिन शेळके यांचा देखील तळेगाव येथील पेट्रोल पंपासमोरच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तसेच सत्तुराने वार केले केले होते. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या शेळकेंना पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी तळेगावमध्ये तणावाचे वातावरण होते. पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. आवारे यांच्या खुनाने मात्र माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खुनाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. सचिन शेळके यांची भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी भारतीय जनता पक्षांचे शहराध्यक्षपद भूषविले होते. तसेच नगरसेवक, उपनगराध्यक्ष, पक्षप्रतोद आणि २००९- २०१० मध्ये त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे. प्रभाग क्रमांक एक मधून शेळके निवडणुकीसाठी इच्छुक होते.दीड महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या सरपंचाचा खूनदीड महिन्यांपूर्वी शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचीही आवारेंप्रमाणेच निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनांमुळे मावळ तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मावळ तालुक्यात गुन्हेगारी डोके वर काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मावळात पुन्हा एकदा खुनाचे सत्र झाले आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळशीसारखाच मावळ पॅटर्न रोखण्याचं आव्हान आता पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here