SCSS मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु काही तोटे देखील आहेत. त्यामुळे योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांनी त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेतले पाहिजेत.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर
एप्रिल-जुन २०२३ कालावधीसाठी SCSS योजनेवर ८.२% व्याज निश्चित करण्यात आला असून सध्या एफडीवर अनेक बँकांचे व्याज वाढल्यानंतर यापेक्षा जास्त व्याज मिळत आहे. अनेक बँका आणि NBFC ज्येष्ठ नागरिकांना ९.५% पर्यंत व्याज देत आहेत. म्हणजेच आता ज्येष्ठ नागरिकांकडे उच्च व्याजासाठी पूर्वीपेक्षा अधिक पर्याय आहेत. जास्त व्याज मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक जुने SCSS खाते बंद करून इतरत्र गुंतवणूक करू शकतात.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना गुंतवणूक मर्यादा
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणूकीवर मर्यादा आहे. म्हणजे या योजनेत तुम्ही एका मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही. २०२३ च्या अर्थसंकल्पात योजनेतील गुंतवणूक मर्यादा ३० लाख रुपयेपर्यंत वाढवण्यात आली आहे, जी आधी १५ लाख रुपये होती.
SCSS योजनेच्या व्याजावर टीडीएस
SCSS योजनेची एक मोठी त्रुटी म्हणजे या योजनेत मिळणाऱ्या व्याजातून टीडीएस कापला जाईल. एका आर्थिक वर्षात मिळणार व्याज ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर टीडीएस कापला जातो. केवळ सरकारी योजना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये टीडीएस कापला जात नाही कारण या योजनेत केलेली गुंतवणूक आणि त्यावर मिळणारे व्याज करमुक्त आहे.
व्याजावरील व्याजाचा लाभ
SCSS मध्ये प्रत्येक तिमाहीत गुंतवणूकदारांना व्याज दिले जाते. गुंतवणूकदारांना प्रत्येक तिमाहीत या व्याजाचा दावा करावा लागतो. तसेच तसे न केल्यास व्याजाच्या रकमेवर कोणतेही व्याज दिले जात नाही.
वयोमर्यादा आणि लॉक-इन कालावधी
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत केवळ ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोकच गुंतवणूक करू शकतात. यो योजनेचा लॉक-इन कालावधी पाच वर्षाचा असून तो पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्याची परिपक्वता पुढील तीन वर्षांसाठी वाढवू शकता.