रायगड (महाड) : राजगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मोहोत येथे क्षुल्लक कारणावरुन एकाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनं तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या गोळीबारामध्ये सोहम आत्माराम हिरडेकर (वय २३) आणि संकेश शशिकांत कदम (वय २८) दोघे रा. भीवघर अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

जखमींना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता पाठवण्यात आले असता एका जखमीच्या पायाला गंभीर जखम झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव रोशन राम मोरे (रा. मोहोत पाटीलवाडी) असं असून आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

कर्नाटकात भाजपचे मनसुबे धुळीला, काँग्रेस बहुमताच्या दिशेने; संजय राऊतांनी मोदी-शाहांच्या जखमेवर मीठ चोळलं
तसेच आरोपीकडून पोलिसांनी बंदूक देखील जप्त केली आहे. महाड तालुक्यातील मोहोत येथे मंदिराच्या जिर्णोद्धाराचा कार्यक्रम असताना पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून ही गोळीबार झाल्याची माहिती आहे. अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे करत आहेत.

महाड तालुक्यात झालेल्या गोळीबार प्रकरणाची रायगड जिल्हा परिषद सोमनाथ घार्गे यांनी गंभीर दखल घेतली आहे. महाड तालुक्यात घटनास्थळी भेट देऊन या सगळ्या प्रकारची सविस्तर माहिती देण्यासाठी ते महाड येथे दाखल होत आहेत. दरम्यान, या सगळ्या गोळीबार प्रकरणाची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे महाड येथे येऊन पत्रकारांना दुपारपर्यंत सविस्तर माहिती देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, राजभवनात इमर्जन्सी लँडिंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here