मुंबई: सूर्यकुमार यादवने १२ मे ला गुजरात टायटन्सविरुद्ध धडाकेबाज शतक झळकावले. सूर्याच्या या दमदार खेळीने सगळ्यांनाच पुन्हा एकदा मंत्रमुग्ध केले. त्याने ४९ चेंडूत नाबाद १०३ धावांची खेळी करत मुंबईला २७ धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. आयपीएलमधील हे सूर्याचं पहिलं आणि टी-२० क्रिकेटमधलं चौथे शतक आहे. सूर्याने हे शतक तर झळकावलेच, पण शतक झळकावल्यानंतर जे लोक त्याची पत्नी देविशाला ट्रोल करत होते, अशा लोकांनाही चांगलीच चपराक लगावली.खुद्द सूर्याने याबद्दल माहिती दिली आहे. आयपीएलने सूर्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मुंबईचा गोलंदाज आकाश मधवाल त्याच्या झंझावाती खेळीबद्दल त्याच्याशी बोलत आहे. आकाशने सूर्याला विचारले की हे त्याचे पहिले आयपीएल शतक आहे आणि यावेळी त्याचे कुटुंब देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते. वहिनी (देविशा शेट्टी) पण बसली होती, मग तुला कसं वाटतंय?

सचिन तेंडुलकरची मोठी फसवणूक; मास्टर ब्लास्टरची मुंबई क्राईम ब्रँचकडे तक्रार, नेमकं काय घडलं?
सूर्याने पाहा काय दिलं उत्तर

सूर्या म्हणाला की संपूर्ण कुटुंबाला पाहून खूप आनंद झाला. विशेषत: देविशा, कारण ती माझी तिन्ही आंतरराष्ट्रीय टी-२० शतके पाहू शकली नाही. त्यावेळेस ती सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये नव्हती. पण यावेळेस देविशा स्टेडियममध्ये होती आणि पत्नीसमोर शतक झळकावले हे पाहून बरे वाटले, असे या तुफानी फलंदाजाने सांगितले. आता देविशा स्टेडियममध्ये सामना पाहायला आली आणि त्यामुळे मी शतक झळकावू शकलो नाही, असे म्हणण्याची संधी आता कोणाला मिळणार नाही.
सूर्याची शतके

सूर्याने यापूर्वी इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये शतके झळकावली आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये देविशा स्टेडियमवर त्याचा सामना पाहायला जाऊ शकली नाही. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर काही ट्रोलर्सनी देविशाला लक्ष्य केल होते. सूर्याच्या फलंदाजीबद्दल बोलायचे तर त्याने पहिल्या ३१ चेंडूत ४७ धावा केल्या, पण त्यानंतर पुढच्या १८ चेंडूत आणखी ५६ धावा करत त्याने आपले पहिले आयपीएल शतक पूर्ण केले. सामन्यातील २०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सूर्याने भन्नाट षटकार लगावत आपले पहिले आयपीएल शतक झळकावले आणि स्टेडियमवर एकच कल्ला पाहायला मिळाला. १६व्या षटकापासून सूर्याने जी फटकेबाजी सुरु केली की सूर्याला रोखणे गोलंदाजांना अधिक कठीण झाले.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here