नागपूर : राज्यात हवामान बदलाचा टप्पा सुरू झाला आहे. अवकाळी पाऊस ओसरला असून सूर्यनारायणही तितक्याच जोमाने फिरू लागले आहेत. राज्यात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, हवामान खात्याने शहरात हिट वेव्हचा इशारा दिला आहे. जिल्ह्यासह विदर्भात तापमान ४५च्या पुढे जाऊ शकते.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढणार असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. या आठवड्याचा शेवट आणि पुढील आठवड्याची सुरुवात उष्णतेने होईल. अकोल्यात शुक्रवारी पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. इतर शहरांमध्येही तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या वर राहिले.

मुंबईकरांची उकाड्याने काहिली! वाढत्या आर्द्रतेमुळे अस्वस्थतेत भर, आज कसे असेल तापमान?
एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली. आता मे महिन्याच्या मध्यापासून सूर्य तळपायला लागला आहे. विदर्भात उत्तरेकडून उबदार वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमानात अचानक वाढ झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मे महिनाभर विदर्भातील जनतेला उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे.

Mumbai News : मुंबईत एप्रिलच्या मध्यापासून करोना रुग्णसंख्येत घट
विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा चाळीशी ओलांडला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र मोखा नावाचे चक्रीवादळ बनले आहे. त्यामुळे उत्तर-पश्चिमेकडून येणाऱ्या उबदार वाऱ्यांचा वेग वाढल्याने तापमानात अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विदर्भासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. सध्या नागपूरकरांना सकाळपासूनच कडक उन्हाचे चटके लागत आहे.

विदर्भाला या तापमानाची सवय झाली असली तरी गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे शहरांमध्ये तापमान वाढू लागले आहे. मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनीही नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले असून, सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Crime Diary: सासू अन् पतीला रोज थोडं-थोडं करून मारणारी मुंबईची सून; वाचा सायलंट किलर ‘सौ’ची कहाणी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here