मुंबईः सुशांतला न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यांच्या कुटुंबीयांसहित सर्वांनी शांत रहावं, असा सल्ला देणाऱ्या यांच्यावर भाजपनं पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सुशांतची केस आता सीबीआयकडे दिली आहे त्यामुळं तुम्ही शांत राहा आणि सीबीआयला न्याय करू द्या, असा टोला भाजप नेते शहनवाज हुसैन यांनी केली आहे.

आत्महत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला असल्याचं सांगतानाच सुशांतला खरोखरच न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्याच्या कुटुंबीयांसहीत सर्वांनी शातं राहावं. पोलिसांना त्यांचा तपास करू द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला होता. यावरूनच भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.

संजय राऊत तुम्ही न्याय देण्यासाठी फारच उशीर केलाय, आणि आता तुम्ही सुशांतच्या कुंटुबियांना शांत राहिल्यास, न्याय मिळेल, असा सल्ला देताहेत. आता तुम्ही शांत राहा, सीबीआय न्याय करेल, असं भाजप नेते शहनवाज हुसैन यांनी म्हटलं आहे. तसं, ट्वीट त्यांनी केलं आहे.

वाचाः

सुशांतप्रकरण सीबीआयकडे

सुशांतसिंह प्रकरण सीबीआयला देण्यास आमचा विरोध नव्हता. नाही. आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा आणि नंतर काही दुवा सुटला असेल तर सीबीआयने त्याचा जरूर तपास करावा. सीबीआयच काय जगातील कोणत्याही संस्थेने हा तपास करावा, पण आधी पोलिसांना तर तपास करू द्या, असं सांगतानाच मुंबई पोलिसांच्या तपासापलिकडे सीबीआय या प्रकरणात वेगळं काही करेल असं वाटत नाही, असं संजय राऊत म्हणाले होते.

वाचाः

दरम्यान, सुशांतच्या कुटुंबियांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपावण्यात यावं अशी मागणी केली आहे. त्यानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंगनं एक व्हिडिओ पोस्ट करून आम्हाला न्याय मिळेल त्यामुळं सुशांतच्या आत्महत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे जावा असं म्हटलं आहे. न्यायाची लढाई आता अधिक तीव्र होत चालली आहे, या प्रकरणाची निष्पक्ष तपासणी झाली पाहिजे आणि सत्य सर्वांसमोर आलं पाहिजे. असंही तिनं म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here