नंदुरबार : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या आईवरच मुलाने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत मुलाबरोबर त्याच्या मामेभावाने देखील या मातेवर हल्ला केला असून तिला जखमी केल्याची घटना तळोदा तालुक्यातून समोर आली आहे. या प्रकरणी जखमी आईने मुलगा आणि भाचा या दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील धजापाणी येथे गुरुवारी मुलाने आईला जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जेरमीबाई बारक्या वळवी असे वृद्ध महिलेचे नाव आहे. ६५ वर्षीय वृद्ध महिला तळोदा येथील धजापाणी येथील रहिवासी आहे. गुरुवारी रात्री या महिलेकडून दारू पिण्यासाठी तिच्या मुलाने पैसे मागितले असता तिने पैसे देण्यास नकार दिल्याने या मातेला जखमी करण्यात आले. तिचा मुलगा २५ वर्षीय दयानंद बारक्या वळवी याच्या सोबत त्याचा मामेभाऊ श्रावण लेहऱ्या वळवी हा गुरुवारी रात्री घरी आला होता.

अग्निशमन साधने तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट, दोन कामगारांचा होरपळून मृत्यू, दोघे जखमी
आई जेरमीबाई हिच्याकडून तिचा मुलगा दयानंद याने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. परंतु जेरमीबाई यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने भाचा श्रावण याने लाकडी काठीने त्यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी सोबत असलेला मुलगा दयानंद याने आईला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांच्या समोर आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोघेही घटनास्थळा वरून निघून गेले.

११ दिवसांपासून बेपत्ता होता तरूण, विहिरीत पाहताच बसला धक्का, दृश्य पाहणंही थरकाप उडवणारं
या प्रकरणी जेरमीबाई यांनी तळोदा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून २५ वर्षीय दयानंद वळवी आणि २६ वर्षीय श्रावण वळवी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक निलेश खोंडे करीत आहे.

काय आक्रित घडलं?, पोलिसांनी बार्शीत गौतमी पाटीलचा शो बंद पाडला; चाहत्यांनी ऐकले फक्त एकच गाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here