मूर्ती लवकर विरघळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तीनाच प्राधान्य द्यावे. तसेच घरीच’ श्रीं’ चे विसर्जन करण्यासाठी महानगरपालिकेकडून सोडीयम बायकार्बोनेट मोफत पुरविण्यात येणार आहे. मूर्ती विक्रेते, प्रभागातील आरोग्य कोठ्या व क्षेत्रीय कार्यालयाचे ठिकाणी सोडीयम बायकार्बोनेट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे महापौर मोहोळ म्हणाले.
वाचा:
‘या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिस अथवा शाडू मातीच्या मूर्ती ऐवजी धातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. अनंत चर्तुदशीला विसर्जन करून परत देव्हाऱ्यात ठेवता येऊ शकते. तसेच ज्या नागरिकांना मूर्तीचे दान करायचे असेल त्यांच्यासाठी पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थाच्या मार्फत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे.’
वाचा:
‘गणेशोत्सवाच्या काळात प्रतिवर्षी पुणे शहरात जवळपास पाच लाख ‘मूर्तींचे विसर्जन होते आणि जवळपास वीस ते पंचवीस लाख गणेशभक्त या दिवशी रस्त्यावर उतरतात. तथापि या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा पद्धतीने एकत्र येणे हे मोठ्या संकटाला आमंत्रण देणे ठरेल. गेले पाच महिने पुणेकरांनी अतिशय जबाबदरीने या संकटात प्रशासनाला साथ दिली आहे. या गणेशोत्सवाच्या कालावधीतही सर्व पुणेकर गर्दी टाळून या करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सहकार्य करतील याची खात्री बाळगतो,’ असेही महापौर म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.