दूध दराच्या मुद्द्यावरून महायुती आक्रमक बनली आहे. दुधाचे दर कमी झाल्याने राज्य सरकारने दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर दहा रुपये द्यावेत. तसेच दूध पावडरीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे, असा आग्रह महायुतीने धरला आहे. या मागण्यांसाठी २१ जुलैला राज्यात सर्व जिल्हाधिका-यांना निवेदने देण्यात आली. आंदोलनाच्या दुस-या टप्प्यात एक ऑगस्टला सरकारला दुधाचा अभिषेक घातला. काही ठिकाणी आंदोलकांनी दुधाची वाहने अडवून दुधाचे मोफत वाटप केले. यानंतरही दूध दराचा प्रश्न सुटला नसल्याने महायुतीने आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू केला आहे. या टप्प्यात १३ ते १८ ऑगस्ट दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री यांना पाच लाख पत्रे पाठवली जाणार आहेत.
रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनाची सुरुवात त्यांच्या गायींच्या गोठ्यातूनच केली. गुरुवारी सकाळी त्यांनी मरळनाथपूर (ता. वाळवा) या त्यांच्या गावात कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिली. सर्व पत्रे पोस्टाद्वारे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली आहेत. या पत्रात म्हंटले आहे की, ‘शेतक-यांची उपजीविका दुधाच्या व्यवसायावर अवलंबून आहे. दुधाचे दर कमी झाल्याने शेतक-यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. सरकारने गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर दहा रुपये द्यावेत किंवा सरकारनेच ३० रुपये दराने दूध खरेदी करावे. तसेच दूध भुकटीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे. महायुतीने गेल्या महिनाभरात दोनवेळा आंदोलने केली. आता तिस-या टप्प्यात पत्रांद्वारे सर्व दूध उत्पादक दरवाढीची मागणी करीत आहेत. सरकारने तातडीने याची दखल घेऊन दरवाढ जाहीर करावी, अन्यथा सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I like the valuable information you provide in your articles.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Thank you for publishing this awesome article.